-->

Ads

हृदयद्रावक ! मुलीच्या मृत्यूनंतर आईनेही घेतला जगाचा निरोप !



प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर 3D NEWS पुसद

महागाव /  तालुक्यातील हिवरा संगम येथे हृदयद्रावक घटनाआयुष्यात मृत्यू कधी कोणाला येईल हे सांगता येत नाही . जिव्हाळ्याच्या नात्याची वीण घट्ट असताना जवळच्या व्यक्तीचा मृत्यू पचवणे कठीण जाते . आपली मुलगी जग सोडून गेली आहे , हे पाहून आईलाही धक्का सहन झाला नाही . मुलीचा अंतिम संस्कार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या आईनेही जीव सोडला . मनाला चटका लावणारी घटना घडली आहे . या बाबत प्राप्त माहिती अशी की , महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे अतिशय दुर्दैवी घटना घडली असून शिंदे कुटुंबावर दु : खाचा डोंगर कोसळला आहे येथील प्रतिष्ठित नागरिक समाधान शिंदे व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या मीनाक्षी समाधान शिंदे यांची मुलगी कू . अपूर्वा शिंदे वय ९ हिचे दि . ५ सप्टेंबर २०२२ रोजी किडनीच्या आजाराने दुःखद निधन झाले होते हिवरा संगम येथील मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला या घटनेला एक दिवस उलटला असताना आज दि .७ सप्टेंबर २०२२ रोजी अपूर्वाची आई विद्यमान हिवरा ग्रामपंचायत सदस्या मीनाक्षीताई शिंदे वय ३१ वर्ष यांचे सुद्धा किडनीच्या आजाराने आज सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास निधन झाले मीनाक्षीताई यांच्यावर उद्या १०:०० वाजता हिवरा संगम येथील मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे . परंतु एकाच कुटुंबातील एकापाठोपाठ अचानक दोघींचा मृत्यू झाल्याने शिंदे कुटुंबावर दु : खाचा डोंगर कोसळला आहे या हृदयद्रावक घटनेमुळे हीवरा संगम परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

Post a Comment

0 Comments