पुसद : चारचाकी व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक ठार झाल्याची घटना पुसद - दिग्रस मार्गावर वरुड शिवारात न्यू प्रतीक धाब्याजवळ घडली . ही घटना काल दि ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी तीन ते चार वाजल्या च्या सुमारास घडली . कैलास माधव शेळके वय अंदाजे ३५ वर्षे ( रा . बन्सी तालुका पुसद ) असे या अपघातातील मृताचे नाव आहे . मिळालेल्या माहितीनुसार , पुसद- दिग्रस रस्त्यावरील वरुड शिवारात असलेल्या कॅनलच्या पुलाजवळ हा अपघात झाला . बांन्सी येथील कैलास माधव शेळके बाहेरगा अंत्यविधीच्या कार्यक्रमावर गेला असताना तो कार्यक्रमावरुन वापस येत असताना भरधाव मोटारसायकलची ( क्र . एम . एच . २ ९ , बि.टी. १५३६ ) सुझुकी स्विफ्ट डिझायर वाहन क्र . एम . एच . १४ जीए ४८४८ या चारचाकीवर जावुन धडकल्याने अपघात होवून आरोपी मृतक हे गंभीर जखमी होवून दुचाकी स्वराचा या अपघातात जागीच ठार झाला ही घटना वरुड शिवारातील न्यू प्रतीक धाब्याजवळ घडली त्यावेळी स्थानिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेला संपर्क करून उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे हलविण्यात आले सायंकाळची वेळ असल्याने डॉक्टरांनी आज दि ६ सप्टेंबर रोजी मृतदेहाचा शिवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आला दरम्यान , या दुर्घटनेची नोंद पुसद शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत .
0 Comments