एक अतिशय विचित्र घटना समोर आली आहे. एका खुन्याने खून केल्यानंतर जे काही केलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आता नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया..
खुनाच्या घटना तुम्ही खूप ऐकल्या असतील, पण तुम्ही कधी अशा खुन्याबद्दल ऐकलं आहे का, जो खून केल्यानंतर मुलींचे कपडे काढायचा. ते काढलेले कपडे स्वत: घालायचा आणि डोक्यावर विग घालायला भाग पाडायचा? होय, असेच एक प्रकरण समोर आला आहे, जिथे एका बिलावरून झालेला वाद इतका वाढला की, एका व्यक्तीने आपल्या मित्राची क्रूरपणे हत्या केली. चला, तुम्हाला संपूर्ण प्रकरण सांगतो.तारीख होती 18 ऑगस्ट, ठिकाण – टँपा, फ्लोरिडा. 42 वर्षीय अर्नाल्डो सिन्ट्रॉन (Arnaldo Cintron) आपली गर्लफ्रेंड गिजेल बोनिला आणि तिची चुलत बहीण हियोजाइरा व्हेल्झ बोनिला यांच्यासोबत राहत होता. त्या दिवशी घरी पार्टी सुरू होती आणि हियोजाइराचा बॉयफ्रेंड एल्गा डेव्हिसही तिथे उपस्थित होता. त्याच रात्री घरात पैशांवरून वाद सुरू झाला. पाहता पाहता भांडण इतकं वाढलं की, अर्नाल्डोने अचानक चाकू उचलला आणि हियोजाइरावर हल्ला केला.हियोजाइराचा बॉयफ्रेंड एल्गा डेव्हिस त्या क्षणी स्तब्ध झाला. त्याला काहीच कळलं नाही की नेमकं काय झालं. त्याने सांगितलं की, ‘मी फक्त घशावर वार केल्याचा आवाज ऐकला आणि अचानक पाहिलं की हियोजाइरा जमिनीवर पडली. अर्नाल्डो वारंवार हियोजाइरावर चाकूने वार करत होता. मी मदत करू इच्छित होतो, पण मला भीती वाटली.’
विग आणि कपडे घालण्यास भाग पाडलं
खून केल्यानंतर अर्नाल्डोने केवळ दहशत पसरवली नाही, तर विचित्र कृत्येही केली. अर्नाल्डो आणि गिजेलने स्वतः हियोजाइराची विग आणि कपडे घातले. त्यानंतर अर्नाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड गिजेलने एल्गा डेव्हिसला धमकावून कपडे आणि विग घालण्यास आणि रक्त साफ करण्यास भाग पाडलं. डेव्हिस घाबरला होता, त्यानंतर त्याने त्यांच्या सांगण्याप्रमाणे केलं, सर्वांनी मिळून मृतदेह किचनमधून गॅरेजपर्यंत नेला आणि नंतर मृतदेह कारमध्ये ठेवला. मृतदेह एका बॉक्समध्ये भरून कारच्या मागच्या सीटवर ठेवला गेला. त्यानंतर ते लोक मृतदेह टाकण्यासाठी निघाले. मृतदेह वीडन आयलंड प्रिझर्व्ह (Weedon Island Preserve) मध्ये पुरला गेला.
सत्य समोर कसं आलं?
मात्र, नंतर डेव्हिसने पोलिसांना संपूर्ण सत्य आणि ठिकाण सांगितलं, ज्यानंतर मृतदेह जप्त करण्यात आला. खून आणि संपूर्ण कट रचल्यानंतर पोलिसांनी 18 ऑगस्ट रोजी अर्नाल्डो सिन्ट्रॉन आणि गिजेल बोनिलाला अटक केली. अर्नाल्डो सिन्ट्रॉनवर दुसऱ्या श्रेणीचा खून, शस्त्राचा वापर, मृतदेह बेकायदेशीरपणे नेणे, पुराव्यांशी छेडछाड आणि साक्षीदारावर प्रभाव टाकण्याचा आरोप आहे. त्याला जामीन न देता तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. गिजेल बोनिलावर 200,000 डॉलर (अंदाजे 1.5 कोटी रुपये) जामिनावर पुराव्यांशी छेडछाड, मृतदेह बेकायदेशीरपणे नेणे, साक्षीदारावर प्रभाव टाकणे आणि खुनानंतर मदत करण्याचे आरोप आहेत.
अटकेनंतर हिल्सबरो काउंटीचे शेरिफ चॅड क्रोनिस्टर म्हणाले, ‘हा खून अत्यंत क्रूर आणि भयानक होता. त्यानंतर त्यांनी पुरावे लपवण्याचा आणि मृतदेह पुरण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न केला तो आणखी क्रूर आहे.’ सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कैद्यांवरील खटला सुरू आहे.
0 Comments