मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला जीवघेणी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढं मारलं की विद्यार्थ्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. या विद्यार्थ्याच्या दोन्ही पायाला फ्रॅक्चर झालं आहे. पीडित विद्यार्थ्यानं मुख्याध्यापकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पीडित विद्यार्थ्याच्या आई-वडिलांनी केली आहे.
उत्तर प्रदेशातील शामली इथे आदर्श मंडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. जय जवान जय किसान इंटर कॉलेमधील मुख्याध्यापकांनी ८ वीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. त्याची चूक एवढीच होती की तो ५ मिनिटं शाळेत उशिरा आला.
गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. वडिलांनी आपल्या मुलावर उपचार केले आणि त्यानंतर थोडं बरं वाटल्यावर त्याला शाळेत सोडलं. हा विद्यार्थी ५ मिनिटं उशिरा आला. त्याने शिस्त मोडली म्हणून त्याला मुख्याध्यापकाने मारहाण केली. एवढं मारलं की त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले.
वडिलांनी या मुलाला सरकारी रुग्णालयात घेऊन गेले. तिथे एक्स रे काढला. त्यावेळी हे धक्कादायक सत्य समोर आलं. या मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. मुलाच्या दोन्ही पायाला प्लास्टर घातलं आहे. आई-वडिलांनी मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0 Comments