-->

Ads

Big Breaking अंबरनाथ पाचव्या मजल्यावरून उडी मारून वाचमन ने केली आत्महत्या

अंबरनाथ शहराच्या पश्चिम विभागातील मातोश्री नगर कॉम्प्लेक्समध्ये इमारतीच्या एका वाचमनने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले.


उस्मान शाह, अंबरनाथ
नोकरीवरून काढून टाकल्यामुळे होता दुःखी

   मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली, मयत वाचमनचे नाव सुरेश कचरू वाघ असे सांगण्यात आले आहे. वाघ हा मातोश्री नगरातील बिल्डरजवळ जवळपास 12 वर्षे नोकरी करत असून मागील 2 वर्षांपासून या संकुलाच्या ए विंगमध्ये पहारेकरी म्हणून काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी वाघ यांना कामावरून काढून टाकले होते.  प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, कामातून काढून टाकल्यामुळे सुरेश वाघ हा अत्यंत दु:खी झाला होता.  पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास सुरू केला आहे.

     पोलिसांना मयतकडून 2 पानांची नोटही मिळाली, यात वाघ यांनी आत्महत्याचा उल्लेख केलेला नाही, परंतु त्या पत्रात संकुलात राहणाऱ्या भाजप पदाधिकारी अमरेश गौडा सहित 5 व्यक्तींची नावे लिहिली आहेत, पत्रात लिहिले आहे की या लोकांनी मला खूप त्रास दिला असून. मला काही बरे वाईट झाले तर त्यास संबंधीत लोक जबाबदार असतील. याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.Post a Comment

0 Comments