-->

Ads

वय वर्ष 16, आई-बाबा बाहेर गेलेले, मुलीने बॉयफ्रेंडला घरी बोलावलं, त्याचवेळी बंद खोलीत गेला एकाचा जीव

बंद खोलीत दोघे प्रणयात रममाण झालेले. आई-बाबा घराबाहेर गेले म्हणून एका 16 वर्षाच्या मुलीने प्रियकराला घरी बोलावलेलं. त्याचवेळी तिथे अशी एक धक्कादायक गोष्ट घडली, ज्याचा दोघांनी पण विचार केला नव्हता.


आई-बाबा घराबाहेर गेले म्हणून एका 16 वर्षाच्या मुलीने प्रियकराला घरी बोलावलं. बंद खोलीत दोघे प्रणयात रममाण झालेले. त्याचवेळी मुलीचा छोटा भाऊ तिथे आला. त्याने बहिणीला नको त्या अवस्थेत पाहिलं. आपल्याला छोट्या भावाने अशा अवस्थेत पाहिलय हे पाहून मुलगी गोंधळून गेली. तिने प्रियकराच्या साथीने भावाची हत्या केली. उत्तर प्रदेशच्या एटामध्ये ही हादरवून सोडणारी घटना घडली.छोट्या भावाची सर्व हालचाल थांबेपर्यंत मुलगी त्याचा गळा दाबत राहिली. रविवारी रात्री उशिराची जलेसर पोलीस ठाणे क्षेत्रातील नगला मितान गावातली ही घटना आहे. आई-बाबा दुसऱ्यादिवशी घरी परतले, त्यावेळी त्यांना मुलाचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला. आईने हंबरडाच फोडला, लगेच पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला असून हत्या गळा दाबण्यामुळे झाल्याच स्पष्ट झालय. बहिणीची चौकशी केली, तेव्हा तिने दिशाभूल करणारी उत्तर दिली. पण पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवातच तिने गुन्हयाची कबुली दिली. जलेसरचे SHO सुधीर कुमार सिंह यांनी ही माहिती दिली.

कुटुंबियांसमोर सत्य सांगितलं

मृत मुलगा चौथ्या इयत्तेत शिकत होता. त्याच्या बहिणीने शाळा सोडून दिलीय. प्रारंभिक चौकशीत मुलगी त्याच गावात राहणाऱ्या विनय शर्मा (20) सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच समजलं. पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर तिने आधी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर कुटुंबियांसमोर गुन्ह्याची कबुली दिली.

दोघांना संबंध ठेवताना पकडलं

SHO सिंह यांनी सांगितलं की, “प्रियकर विनय शर्मा रात्री उशिरा मुलीला भेटायला आला, त्यावेळी वडिल शेतावर गेले होते. आई घरी नव्हती. त्याचवेळी छोट्या भावाने दोघांना संबंध ठेवताना पकडलं. तो त्यांच्याजवळ गेला आणि आरडाओरडा करण्याची धमकी दिली” त्याचा आवाज बंद करण्यासाठी विनयने त्याचं तोंड दाबलं.

मुख्य आरोपी तुरुंगात, मुलगी कुठे?

मुलीने त्याचा गळा आवळला. त्यानंतर विनय घटनास्थळावरुन फरार झाला. दुसऱ्यादिवशी सकाळी मुलीने छोट्या भावाचा मृत्यू झाल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. DSP जलेसर ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितलं की, ‘विनय शर्माला मंगळवारी तुरुंगात पाठवण्यात आलय. मुलीला बाल सुधारगृहात ठेवण्यात आलय”


Post a Comment

0 Comments