-->

Ads

पैलवान रामेश्वर काळे यांची 92 किलो माती विभागावर नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरी साठी निवडप्रतिनिधी शुभम तुपकरी हदगांव


 समर्थ व्यायाम शाळा नांदेड येथील पैलवान रामेश्वर गोपीनाथ काळे यांच्या कुस्त्या खूपच रंगतदार होत असतात पैलवान रामेश्वर काळे हे मागील पाच ते सहा वर्षांपासून कुस्ती खेळत असतात त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक कुस्त्या खेळल्या त्यांना आजपर्यंत सात ट्रॉफी व नांदेड जिल्ह्यातील जुना कवठा येथे श्री गुरुगोविंद सिंगजी कुस्ती आखाडा येथे राहून मागे झालेल्या लिमगाव येथील नालासाहेब केसरी येथील मानाची चांदीची गदा व रोख बक्षीस 1000 पटकावले होते त्यानंतर मागील पाच वर्षापासून कोल्हापूर येथील मोतीबाग तालीम येथे राहून सराव करून महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत 79 किलो वजन गटातून पैलवान रामेश्वर काळे यांनी 2019 मध्ये नांदेड जिल्हा चॅम्पियन आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीमध्ये सहभाग घेतला होता अशा नांदेड जिल्ह्याच्या पैलवानाने आता नुकत्याच झालेल्या कोलंबा यात्रा येथे देखील त्यांनी कुस्तीमध्ये 21 हजार रुपये व मेडल बक्षीस मिळवले होते पैलवान रामेश्वर काळे यांची कुस्ती बघण्यासाठी आजूबाजूच्या तालुक्यातील व गावातील लोकांची गर्दी होत असते पैलवान रामेश्वर काळे यांची 92 किलो माती विभागावर नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरी साठी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे

Post a Comment

0 Comments