-->

Ads

Breaking : डोंबिवली MIDC तील एका कंपनीत भीषण स्फोट, 5 ते 6 कामगार जखमी


BREAKING NEWS

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील परिसरात एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. यामुळे आजूबाजूचा परिसर हादरला असून आसपासच्या अन्य दोन ते तीन कंपन्यांना देखील आगीची झळ पोहोचल्याचं कळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील रहिवासी इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेत कंपनीतील पाच ते सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत तर परिसरातील काही नागरिकांना देखील काचा फुटून जखमा झाल्या आहेत. या जखमींचा निश्चित आकडा अद्याप कळालेला नाही.

पावणे दोनच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी फेस दोन मधील अंबर केमिकल कंपनीमध्ये ब्लास्ट झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. डोंबिवली अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.


Post a Comment

0 Comments