-->

Ads

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्राध्यक्षपद जाणार? मोठा झटका, पडद्यामागील घडामोडींना वेग

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावून मोठा धक्का दिलाय. हेच नाही तर भारताबद्दल त्यांनी काही धक्कादायक विधाने देखील केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या घडामोडींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळा फोन लावला. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोनकडे मोदींनी दुर्लक्ष केले.


डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतार तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. रशियावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेकडून हा टॅरिफ लावला. भारताने या टॅरिफचा विरोध केला. मात्र, अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. आता परत एकदा अमेरिकेकडून सांगण्यात आले की, तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करा आम्ही तुमच्यावरील 25 टक्के टॅरिफ हा रद्द करू. मात्र, भारत हा कधीच अममेरिकेची ही अट मान्य करणार नाही. भारत काहीही झाले तरीही अमेरिकेच्या पुढे झुकत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट उठला आहे.



भारताच्या विरोधात पुढील काही दिवसांमध्ये असून सक्त पाऊले उचलली जाण्याची शक्यता आहे. हेच नाही तर रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्याने टार्गेट केले जात असतानाच रशियासोबत काही करार करण्याच्या तयारीत अमेरिका आहे. आता भारतावर टॅरिफ लावणे डोनाल्ड ट्रम्प यांच्याच अंगलट आल्याचे बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच युक्रेन आणि रशियात युद्ध सुरू आहे.

भारताकडून मिळणारा पैसा रशिया हा युद्धात लावतोय. आता अमेरिकेतूनच डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील टॅरिफबद्दल टीका होताना दिसतंय. लोक पुढे येऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात बोलत आहेत. डेमोक्रेटिक पॅनलने डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर टीका करत म्हटले की, अमेरिका पुतिनला युक्रेनवर हल्ला करण्यापासून थांबवू शकत नाही. असे वाटते की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारचा महत्वाचा मुद्दा हा युक्रेन युद्ध नाहीये. भारताला लक्ष केल्याने अमेरिकेचे नुकसान होत आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध वाईट होत आहेत. चीन आणि दुसऱ्या देशांवर टॅरिफ लावण्याऐवजी ट्रम्प सरकारने भारतावर टॅरिफ लावले आहे.

हेच नाही तर काही लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात रस्त्यावर देखील उतरली आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्राध्यक्षपद धोक्यात येऊ शकते. आता खरोखरच असे वाटतंय की, विषय हा युक्रेनच्या युद्धाचा नाही तर दुसरेच काहीतरी आहे. फक्त भारत आणि इतर देशच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्याने त्यांच्यावर अमेरिकेतूनही जोरदार टीका होताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे फोन उचलणेही बंद केले आहेत आणि दोघांमधील संवाद थांबला आहे.

Post a Comment

0 Comments