-->

Ads

Darshana Pawar : माझी मुलगी गेली, इतरांच्या जावू नयेत; राहुलच्या अटकेनंतर दर्शनाच्या आईची प्रतिक्रिया

Darshana Pawar Murder Case :दर्शना पवार हत्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी राहुल हंडोरेला अटक केली आहे.






अहमदनगर, 22 जून : दर्शना पवार हत्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी राहुल हंडोरेला अटक केली आहे. दर्शना पवार बेपत्ता झाल्याच्या आधी शेवटची ती राहुल हंडोरेसोबत दिसली होती. दोघे राजगडावर गेले होते. त्यानंतर राजगडावरून फक्त राहुल हंडोरे एकटाच परत आल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसलं होतं. दरम्यान, यानंतर फरार असलेल्या राहुल हंडोरेला पोलिसांनी अटक केलीय. राहुलला अटक झाल्यानंतर दर्शनाच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला असून तिच्या भावाने आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्यथा मारून टाका अशी प्रतिक्रिया दिली.

दर्शना आपल्या मित्रासोबत 12 जून रोजी राजगडावर गेली होती. त्यानंतर दर्शनाचे वडील दत्तू दिनकर पवार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 18 जून रोजी राजगडावर एक तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळता. अधिक तपास केला असतो तो मृतदेह दर्शना पवार हिचा असल्याचं समोर आलं.

Post a Comment

0 Comments