-->

Ads

Bhandara Accident News: वाळूने भरलेल्या ट्रकची ट्रॅक्टरला जोरदार धडक; १ ठार तर २ जण गंभीर जखमी

 जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


Accident News: राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. भंडारा जिल्ह्यात एका ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १ जण जागीच ठार झाला असून २ जण गंभीर जखामी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भंडारा जिल्ह्याच्या तुमसर बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर सिंदपुरी जवळ वाळूने भरलेल्या ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार बसली वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जन गंभिर जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

मच्छेरा गावातील रहिवासी कन्हैया रहांगडाले हे आपल्या ट्रॅक्टरने जनावरांसाठी चारा आणायला गेले होते. ते पहाटे ४ वाजेच्या सुमारास रस्त्याने जात होते. सिंदपुरी गावाजवळ बपेराकडून भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूने भरलेल्या ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली त्यात ट्रॅक्टरच्या समोरिल भागाचा चेंदामेंदा झालाय. अपघातात ट्रॅक्टर चालक कन्हैया रहांगडाले यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी उप जिल्हा रूग्णालय तुमसर येथे हलविण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments