-->

Ads

जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून ५० विधवा महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप


महिलांनी मानले जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांचे आभार





टिटवाळा :

जिजाऊ सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून कल्याण ग्रामीण भागातील विधवा महिलांना समाज कल्याण विभागा मार्फत शिलाई मशीन वाटप करण्यात आले. टिटवाळा येथील रेश्माई शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  यावेळेस परिसरातील अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे समाजात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करावे याकरिता संस्था अविरत कार्यरत आहे. महिलांनी सक्षम व्हावे म्हणून जिजाऊ संघटना महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे ठाणे जिल्हा उपक्रम प्रमुख अजित जाधव यांनी सांगितले.

यावेळी अनेक महिलांनी मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करताना महिला अत्यंत भाऊक झाल्या होत्या यावेळी आपल्या हातात मशीन घेतल्यानंतर अनेक महिलांना अश्रू अनावर झाले स्वतःच्या पायावर उभा राहणार आता आपल्याला कोणाकडे हाथ पसरायची गरज नाही या प्रेरणेने उपस्थित महिलांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाचे विद्याधर सर सामाजिक उपक्रम प्रमुख अजित जाधव उतणे येथील संजय जाधव शाखाध्यक्ष गुरवली गाव स्वप्निल देशमुख शाखाध्यक्ष जनार्दन भागरे रेश्माई शाळेचे मुख्याध्यापक सुरेश देशमुख रोहन गावचे पोलीस पाटील उत्तम रोहणे अविनाश जाधव ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष वैभव मसने कल्याण तालुका प्रमुख महेंद्र अंभोरे जिजाऊ सदस्य अण्णा हिंदोळे नम्रता ठाकरे अरविंद जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कल्याण ग्रामीणचे प्रमुख महेंद्र आंबोरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments