-->

Ads

▪️ चोरांच्या पाठीराख्यांचा शोध घेतला जाईल का?





▪️ महागाव ची गोपनीय शाखा नावालाच

▪️ फुलसावंगीचे व्यापारी भिती मुक्त होतील का?

फुलसावंगी प्रतिनिधी / 

               येथे गुरुवारी रात्री दोन किराणा व एका मेडिकल स्टोअर्स मध्ये चोरी झाली होती.प्रसार माध्यमांनी पोलिस विभागावर टिकेची झोड उठवल्यावर पोलिस विभाग अॅक्शन मोड वर येऊन केवळ ४८ तासात चोरीत सामिल असलेल्या चारही चोरांना जेरबंद करण्यात यश आले आहे. परंतु महत्त्वाचा प्रश्न हा अनउत्तीर्ण च आहे की, या चोरीच्या गुन्ह्यातील चार पैकी तिन आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन ते यवतमाळ येथील असुन जवळपास ११० कि मी वर असलेल्या फुलसावंगीत दोन दोन दिवस वास्तव्य करतात आणि चोऱ्यांना आयाम देतात त्यामुळे असे सराईत गुन्हेगार फुलसावंगीत येतात तेव्हा त्यांचा पाठीराखा कोण? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यांना आश्रय देणाऱ्या पाठीराख्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा पाठीराख्यांन वर कारवाई चा बडगा उगारला तरच भविष्यात अशा सराईतांना गावात कोणीही आश्रय देण्यास धजावणार नाही.

              आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणता सराईत गुन्हेगार आहे आणि कोण गुन्हेगाराला मदत करतो किंवा गुन्हेगारीला खत पाणी घालतो, यावर बारीक लक्ष ठेऊन संभाव्य होणाऱ्या गुन्ह्याच्या घटना रोखण्याचे काम गोपनीय शाखेचे असुनही महागाव ठाण्याच्या गोपनीय शाखेकडून असे होताना दिसत नाही. त्यामुळे येथील गोपनीय शाखा फक्त नावालाच उरली असल्याचे नागरिकातुन उघड उघड बोलल्या जात आहे.

              फुलसावंगीची व्यापार पेठ तालुक्यातील मोठी व्यापार पेठ म्हणुन ओळखली जाते या व्यापार पेठेशी चाळीस गावच्या लोकांचा संबंध येतो. यामध्ये बाहेर गावचे व्यापारीही व्यापार करतात. एवढ्या मोठ्या व्यापार पेठेच्या ठिकाणी सतत लहान सहान चोऱ्यांचे सत्र सुरू असल्याने येथील व्यापारी वर्ग दहशतीत आपला व्यापार करत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने रात्रीची पेट्रोलींग करावी व व्यापारी वर्गाशी संवाद वाढवुन सतत त्यांच्या संपर्कात राहुन त्यांच्या मध्ये निर्माण झालेली भिती दुर करावी.

*___*_________**___

         ▪️ फुलसावंगी मध्ये चांगल्या दर्जाचा अमली पदार्थ (गांजा) सहज उपलब्ध होत असल्याने सदर चोरीत असलेले यवतमाळ चे तिन्ही आरोपी फुलसावंगीला अमली पदार्थ सेवना साठी आले होते अशी चर्चा पोलिस वर्तुळातुन ऐकण्यात येत आहे.

**___**___

▪️ अशा गुन्हेगाराला स्थानिक कोण सहकार्य करत आहेत या दिशेने ही तपास चालु आहे. निश्चितच तशा समाजाला घातक लोकांन वर ही कायदेशीर कारवाई करु.

      ▪️ संजय खंडारे,

           ठाणेदार महागाव

Post a Comment

0 Comments