-->

Ads

शिक्षिका बाथरूममध्ये जाण्याआधी आत ठेवायचा मोबाईल अन्...; पुण्यातील अल्पवयीन मुलाचं धक्कादायक कृत्यगुन्हेगारीचं प्रमाण आजकाल बरंच वाढलेलं दिसतं. विशेष बाब म्हणजे आता लहान मुलांमध्येही हे प्रमाण वाढत आहे. पुण्यातून सध्या याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. यात एका 16 वर्षीय मुलाने शिकवणी घेण्यासाठी घरी येणाऱ्या 56 वर्षीय शिक्षिकेचं आक्षेपार्ह व्हिडिओ काढले (Minor Boy Shoot Offensive Video of Female Teacher in Bathroom). हा धक्कादायक प्रकार पुण्यातील (Pune Crime) कर्वेनगर परिसरात घडला.

पीडित शिक्षिकेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या मुलाविरोधात अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातल्या कर्वेनगर परिसरात संबंधित शिक्षिका एका सोसायटीतील मुलाला मागच्या 5 वर्षांपासून इंग्रजी विषयाची शिकवणी देण्यासाठी जात होती. मात्र, 3 मार्च ते 30 मार्च का काळात या मुलाने शिक्षिका वॉशरूममध्ये जाण्यापूर्वी आपला फोन आतमध्ये ठेवला आणि ५६ वर्षीय शिक्षिकेचे व्हिडिओ रेकॉर्ड केले.

या प्रकरणाचा खुलासा होताच शिक्षिकेनं 16 वर्षीय मुलाविरोधात पोलिसांत तक्रार दिली. यानंतर अलंकार पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. याआधीही या मुलाने असे काही प्रकार केले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. मात्र, हे संपूर्ण प्रकरण जाणून मुलाचे पालकही चक्रावले आहेत.

याशिवाय नुकतंच पिंपरी चिंचवडमधून समोर आलेल्या एका घटनेत पेशाने शिक्षक (techer) असलेल्या एका तरुणाने आपल्याच नात्यातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फटके देण्याची धमकी देत शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली होती. पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या या नराधमाने आपल्याच नात्यातील मुलीसोबत हे कृत्य केलं होतं. आरोपी हा पीडितेचा आते भाऊ आहे. आरोपी हा खासगी शिकवणी वर्ग घेतो. पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून त्याने तिला घरात बोलावले. त्यानंतर 25 फटके मारीन अशी धमकी देऊन अश्लिल कृत्य केलं.

Post a Comment

0 Comments