-->

Ads

पनवेलकर होम्स येथे माजी नगरसेवक श्री. निखिल अरविंद वाळेकर यांनी भेट दिली असता त्या वसाहतीत A1 to A8 व नवीन तयार होणाऱ्या २ बिल्डिंग आहेत, त्या ठिकाणी सध्या राहणारे रहिवाशांना गेली २ ३ वर्षांपासून पाण्याबाबत समस्या आहे,

अनियमित व कमी दाबाने पाणी, वारंवार जीवन प्राधिकरण कार्यालयात सतत २०१९ पासून पाठपुरावा येथील नागरीक अधिकार्यांची मनमानीला कंटाळून शेवटी स्थानिक नगरसेवक 

श्री. निखिल अरविंद वाळेकर यांच्या समवेत जीवन प्राधिकरण कार्यालयांतून अधिकारी श्री.किशोर शेकाकोरे साहेब हे प्रत्यक्षपणे उपस्थित होते, नागरिकांनी खर वास्तव पुरावे देऊन प्रशासनाला धारेवर धरले. निखिल वाळेकर यांनी सर्व बिल्डिंगला वेगवेगळ्या पाण्याची लाईन टाकून मिळाली पाहिजे. 

शेकाकोरे साहेब यांनी उप अभियंता श्री. बसवणकर साहेब यांना सर्व नागरीकांसमोर फोन करुन सर्व माहिती दिली व निखिल वाळेकर यांनी दिलेला सल्ला मान्य केला. पाणी चांगल्या दाबाने येण्यासाठी मेन पाण्याच्या टाकीवरुन सरळ लाईन टाकावी, त्यामुळे टेकडी, मुरलीधर नगर, मुरलीधर मंदिर मागिल वसाहतीला पाण्याची समस्या सुटू शकते हे साहेबांनी मान्य केले. यावेळी प्रकाश डावरे सर, गुलाब जाधव, जीवन उंडे, स्वप्निल क्षेत्रे, स्वप्निल भामरे, अनंत जाधव सर, प्रशांत करपे सर्व विंगचे पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.🚩🚩💐💐💐🚩🚩

Post a Comment

0 Comments