-->

Ads

सोलापुरात अंगावरची हळद उतरण्यापूर्वीच रक्त सांडलं, लग्नाच्या दोन महिन्यातच पत्नीला संपवलं!

 याप्रकरणी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Husband Killed Wife due to Doubt of character at Solapur)


सोलापूर : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील डोणगावमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Husband Killed Wife due to Doubt of character at Solapur)

दोन महिन्यापूर्वीच विवाह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील डोणगाव येथे आरोपी गणेश बंडगर राहतो. त्याचे दोन महिन्यापूर्वीच गणेश आणि अमृताचा विवाह झाला होता. विवाहनंतर काही दिवसांनी गणेश त्याच्या पत्नीवर चारित्र्यावरुन संशय घ्यायचा. दिवसेंदिवस त्याचा संशय वाढत चालला होता. यामुळे या दोघांमध्ये दररोज भांडण होतं.

रागाच्या भरात पत्नीवर कुऱ्हाडीने वार

कालही अशाचप्रकारे त्या पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की पती गणेश बंडगरने रागाच्या भरात पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला. यामुळे अमृताचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या घटनेनंतर त्याने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी गणेश बंडगर याच्यावर सलगर वस्ती पोलीस चौकीत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Husband Killed Wife due to Doubt of character at Solapur)


Post a Comment

0 Comments