बऱ्याचदा आपण पाहतो किरकोळ वादांचं रूपांतर हाणामारीत होतं. असे बरेच व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे तुम्ही पाहिले असतील. पण सध्या असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो खूपच धक्कादायक आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला कानाखाली मारली त्या व्यक्तीने रागात थेट छातीवरच गोळी झाडली आहे. दिवसाढवळ्या झालेला हत्येचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
कानाखाली मारल्याचा एका व्यक्तीने ऑन द स्पॉट असा सूड उगवला ज्याचा कुणी विचारही केला नसेल. किरकोळ कारणावरून ही हत्या करण्यात आली आहे. व्हिडीओत पाहू शकता एका ठिकाणी काही लोक उभे आहेत. एक व्यक्ती पाठमोरी उभी आहे. तिच्या मागून एक व्यक्ती येते आणि ती त्या पाठमोऱ्या व्यक्तीला मारते. त्या व्यक्तीला जोरात कानशिलात लगावते. त्या व्यक्तीला इतक्या जोरात कानाखाली बसते की ती जमिनीवरच कोसळते. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी होते. पण तिथं असलेले इतर लोक त्यांना थांबवतात. त्यानंतर दोघंही शांत होतात.
ज्या व्यक्तीला कानाखाली मारण्यात आली ती व्यक्ती दरवाजातून बाहेर पडताना दिसते. आता सर्वकाही मिटलं असं आपल्यालाही वाटतं. पण पुढे जे घडतं ते धक्कादायक आहे. दरवाजाजवळ पोहोचताच ही व्यक्ती आपल्याजवळील बंदूक बाहेर काढते आणि कानाखाली मारणाऱ्या व्यक्तीवर ताणून धरते. त्या व्यक्तीच्या छातीवर गोळी झाडून ही व्यक्ती फरार होते. त्यानंतर घाबरून तिथून सर्वजण पळून जातात. गोळी लागलेली व्यक्ती तिथंच तडफडताना दिसते. कुणीच तिच्या मदतीसाठी येत नाही.
हत्येचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. @ChicagoCritter ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमधील माहितीनुसार ही घटना शिकागोतील वेस्ट गारफिल्ड पार्कमधील एका दुकानातील आहे.
0 Comments