-->

Ads

धक्कादायक! खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत भल्या पहाटे आणखी एक खून; गेल्या २ दिवसापासून दुसरी हत्येची घटना


मी ज्ञानेश्वर मेट क र 3D NEWS पुसद 9527308455


पुसद: तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरात हत्यांचे सत्र सुरू आहे. आज पहाटे आमदरी घाटात एका युवकाचा गळा कापून खुन करण्यात आल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. गेल्या दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे खंडाळा पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज भल्या पहाटे एका युवकाचा पुसद-हिंगोली रोडवरील आमदरी घाटा जवळ खून झाल्याची घटना घडली आहे. मृत युवक हा मांडवा येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस

निरीक्षक बालाजी शेंगेपल्लु यांच्यासह बीट जमादार पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले.पोलिसांच्या

प्राथमिक अंदाजानुसार युवकाचा खून करण्यात आला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.खून झालेल्या युवकाचे नाव गजानन बंडू ढोले वय १९वर्षे रा.मांडवा ता.पुसद जि. यवतमाळ असे आहे. त्याच्या खिशात आधार कार्ड सापडले असून त्याद्वारे त्याची ओळख पटली असून या घटनेची माहिती नातेवाईकाला देण्यात आली व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे पाठवण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पण खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जवळपास एकाच दिवसात दोन खुनाच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments