ढाणकी प्रतिनिधी
मुलाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन मेट येथे दिनांक 31 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते त्यामध्ये गावातील 140 रुग्णांनी सहभाग नोंदविला.
ढाणकी पासून जवळ असलेल्या मेट या गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सैनिक उत्तमराव राठोड यांचा नातू व भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम राठोड व मेट च्या सरपंच सौ प्रवीणा विक्रम राठोड यांच्या मुलगा किआन याचा प्रथम वाढदिवस काही वेगळं करून साजरा करण्याचा मानस विक्रम राठोड यांनी व्यक्त केला आणि त्यांच्या संकल्पनेतून या भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रोगनिदान शिबिराला पुसद येथील आयकॉन हॉस्पिटल चे व डॉ आदित्य सौंदनकर, डॉ अमोल पवार, डॉ राजकुमार ठाकरे, डॉ किशोर देव्हारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विक्रम राठोड यांना परिसरामध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते. मेट मधील असो वा परिसरातील कोणत्याही व्यक्तीच्या मदतीला धावून जाणारे असे ते व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या मुलाचा वाढदिवस घरच्याघरी साजरा न करता वाढदिवसा मधूनही काहीतरी सामाजिक कार्य घडावे या हेतूने त्यांनी या रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते.
0 Comments