-->

Ads

शहरातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळासाठी भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन !

पुसद : गणपती बाप्पा मोरया ... मंगलमूर्ती मोरया .... अशा जयघोषाने अवघी पुष्पावंती नगरी दुमदुमली असुन सगळीकडे भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.बाप्पाच्या आगमनाने घराघरात मंगलमय वातावरण आहे . शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गणशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे . नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने यंदा पुसद शहर हद्दीतील उत्कृष्ठ गणेश मंडळांना बक्षीस देऊन गौरव करण्याचे हेतू आहे . पुसद शहर हद्दीतील सर्व नोंदणीकृत गणेश मंडळांसाठी भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे या वर्षी पासून उत्कृष्ट मूर्ती , गणेश मंडळांनी १० दिवसात राबिविलेले उत्कृष्ट सामाजिक उपक्रम व गणरायांना निरोप देताना काढल्या जाणारी शिस्तबद्ध मिरवणूक या ३ श्रेणी साठी स्पर्धा आयोजित केली आहे . प्रत्येक श्रेणीत १५ हजार रु , ११ हजार रु व ७ हजार रुपये असे एकूण ९ बक्षीस , व सन्मान चिन्ह तसेच प्रशस्तीपत्र देऊन सहभागी मंडळांनाचा सलमान करण्यात येणार आहे यासाठी निवड समितीतील सदस्य शहरातील गणेश मंडळाला भेटी देऊन सर्व माहिती घेतील तसेच गणरायाचा फोटो व व्हिडीओ शूटिंग काढले जाणार आहे . ९ तारखे पर्यंत प्रत्यक्ष मंडळाची पाहणी करून १० तारखेला विसर्जन मिरवणुकीत परीक्षण केले जाईल . या निवड समितीचे प्रमुख ललित सेता , सदस्य गजानन मोगरे , स्वप्नील चिंतामणी , अमोल ताजनेकर , निलेश राजुलवार यांची टीम स्पर्धेच्या परीक्षण हेतूने मंडळांना भेट देण्यासाठी येत असून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्षअॅड . आप्पाराव मैंद , सामाजिक उपक्रम समिती अध्यक्ष शरद मैंद , उपाध्यक्ष अॅड . भारत जाधव , सर्व संचालक मंडळ तथा सामाजिक उपक्रम समिती सदस्यांनी केले आहे . स्पर्धेतील विजेत्या मंडळांची नावे बक्षीस वितरणाचे दिवशीच जाहीर केले जाईल अशी माहिती झेप न्यूज शी बोलताना देण्यात आली आहे .

Post a Comment

0 Comments