-->

Ads

सांडवा (धनसिंगनगर) शिवारात वीज कोसळुन युवक जख्मी तर एका बैलांचा जागिच मृत्यू ; अचानक आलेल्या पावसात घडलेला प्रकार

पुसद : तालुक्यातील धनसिंगनगर सांडवा शिवारातील आज सायंकाळी ५ : ०० वाजल्याच्या सुमारास अचानक आलेल्या पावसात वीज अंगावर कोसळून युवक जख्मी तर एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली . याबाबत प्राप्त माहिती अशी , की धनसिंगनगर सांडवा शिवारातील शेत शिवारात शुभम इंदल चव्हाण वय १८ वर्षे आपल्या बैलांना चारत असताना अचानक आकाशात वातावरणनिर्मीती होऊन विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला . काही कळण्याच्या वूआतच एका बैलाच्या अंगावर वीज कोसळली . वीजेच्या धक्क्याने बैलांचा जागीच मृत्यू झाला . तर हा युवक विजेच्या दहाकतेने किरकोळ जखमी झाला असून जखमी युवकाला उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे उपचाराची दाखल करण्यात आले आहे . परंतु बैल मृत्युमुखी पडल्याने ऐन हंगामात या शेतकऱ्याला ५० ते ६० हजार रूपयांचा फटका बसल्याने प्रशासनाने तात्काळ मृत बैलाचे शवविच्छेदन करून वीजग्रस्त शेतकऱ्यांना अपातग्रस्त विभागाकडून तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे .

Post a Comment

0 Comments