-->

Ads

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा, पित्याकडून 14 वर्षाच्या पोटच्या मुलीवर वारंवार बलात्कार, संतापजनक घटना

 

पिता आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जगतो. पित्याचं मन हे मुलीसाठी आकाशाएवढं असतं. पण बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात बाप-लेकीच्या याच पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.






    पाटणा,  : आपले आई-वडील आपलं सर्वस्व असतात. आई-वडील आपल्या मुलांसाठी खरंच खूप मेहनत करतात. मुलांना कोणत्याच गोष्टींची कमतरता भासू नये यासाठी ते सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. पिता हा आपल्या घराचं छत्र असतो. पिता म्हणजे आपला पोशिंदा असतो. पित्याचं आपल्या लेकरांमध्ये प्रचंड जीव असतो. विशेषत: घरात जेव्हा मुलगी असते तेव्हा पिता संवेदनशील झालेला असतो. आपल्या मुलीला काय हवं-नको ते तो पाहत असतो. पिता आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जगतो. पित्याचं मन हे मुलीसाठी आकाशाएवढं असतं. पण बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात बाप-लेकीच्या याच पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

    बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधम बापाने आपल्या पोटच्याच लेकीवर वारंवार बलात्कार केला. पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे. ती अवघ्या 14 वर्षांची आहे. आरोपी पिता हा गेल्या चार महिन्यांपासून आपल्या लेकीवर अत्याचार करत होता. पीडितेने सुरुवातीला लोक काय म्हणतील या भीतीने आपल्या जन्मदात्या पित्याकडून होणारा अत्याचार सोसला. पण आरोपी पित्याकडून वारंवार पीडितेवर अत्याचार करण्यात येत होता. अखेर पित्याकडून सुरु असलेल्या या अत्याचारा असह्य झाल्याने पीडिताने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना जेव्हा संबंधित प्रकार समजला तेव्हा पोलीसही हैराण झाले. एक आपल्या आपल्या लेकीसोबत असं कसं वागू शकतात? असा प्रश्न त्यांना पडला.


    पीडितेने पोलिसांना आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. "माझे वडील कपडे, चॉकलेट घेवून देण्याच्या निमित्ताने किंवा बाजारात फिरवून नेण्याचे निमित्ताने वारंवार अत्याचार करतात. याबद्दल मी आईलाही सांगण्याचा प्रयत्न केला. पण वडिलांनी मला सांगण्यास मनाई केली होती. त्यांच्या भीतीमुळे मी आईला सांगू शकत नव्हती. एकदी मी आईला सांगण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा वडिलांनी मला प्रचंड मारहाण केली होती", असं पीडितेने पोलिसांना सांगितलं.

    पीडितेची आई शुक्रवारी (9 सप्टेंबर) माहेरी गेली होती. त्यावेळी पीडिता घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी पित्याने पुन्हा घृणास्पद कृत्य केलं. त्यानंतर पीडिता आपला जीव वाचवत घराबाहेर पडली आणि थेट पोलीस ठाण्यात जावून पोहोचली. तिने पोलिसांना आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस या प्रकरणी पुढचा तपास करत आहेत.

    Post a Comment

    0 Comments