-->

Ads

पुसद | आताची सर्वात मोठी बातमी पुसद शहरात एका 18 वर्षीय मुलावर 7 चाकूचे घाव मारून त्याला जिवाने मारण्याचा प्रयन्त करण्यात आला

सदर घटना ही दि. 05 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली. अनिकेत पवार वय अं. 18 वर्ष रा. कातरवाडी हल्ली मुक्काम पुसद असे जखमी मुलाचे नाव आहे. सदर घटना ही चिंतामणी कोचिंग क्लासेस काचघर जवळ घडल्याचे सांगण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत पवार हा वसंत नगर पोलीस स्टेशन येथील पोलीस नाईक संजय पवार यांचा पुतण्या आहे. तसेच हल्ला करणारा ऋतिक कांबळे हा शहर पोलीस स्टेशन येथे ड्रायव्हर म्हणून असलेले अनिल कांबळे यांचा मुलगा आहे. आरोपीच्या मागे पोलीस कर्मचारी गेले असून त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच जखमी मुलाची स्थिती सध्या नाजूक असून त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments