यंदाचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पिपळवांडी येथील जि .प .म .शाळेचे मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक यम. बि .सागंळे यांना पुरस्कार देऊन पंचायत समिती उमरखेड कडून शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी सपत्नीक गौरविण्यात आले.
उमरखेड, दि. ११ ( संजय जाधवप्रतिनिधी )
सागंळे यांनी मागील १२ वर्षे जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा पिपळवांडी येथील मुख्याध्यापक पद यशस्वीपणे सांभाळून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधा यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. सहकारी शिक्षक, प्रशासन, शाळा व्यवस्थापन . समिती, गावकरी मंडळी यांच्यासोबत उत्कृष्ट समन्वय साधून शाळेचा विकास त्यांनी घडवून आणला आहे.
. यापूर्वी त्यांनी त्यांनी बिड येथे सुद्धा उत्कृष्ट शैक्षणिक कार्य केले आहे. या कार्यामुळे त्यांना शिक्षक दिनी तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला यावेळी मंचावर आमदार नामदेव ससाने, पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रवीणकुमार वानखेडे, शिक्षण अधिकारी पांडुरंग खांडरे, गटशिक्षणाधिकारी दर्शनवाड उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचा सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वृंद, पिपळवाडी येथील नागरिकाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत
0 Comments