-->

Ads

नगरपरिषद शिक्षक सहकारी पतसंस्था ३१ यांची वार्षिक आमसभा सपन्न .


पुसद : दिनांक २८ ऑगस्ट २०२२ हॉटेल अनुप्रभा येथे नवनिर्वाचित संचालक मंडळाची प्रथम आमसभा सपन्न झाली यामध्ये मंचावर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ . सोनल ययातीराव नाईक सामाजिक कार्यकर्त्या , सौ . रश्मी राठोड सामाजिक कार्यकर्त्या , सौ . सिमा सुनील चव्हाण सामाजिक कार्यकर्त्या , श्री . मनीष राठोड सर अध्यक्ष पुरोगामी शिक्षक संघटना यवतमाळ , अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक श्री . सुभाष देशमुख सर तसेच श्री . ओमप्रकाश तिवारी सेवानिवृत्त शिक्षक व श्रीमती वहिदा रेहमान उपाध्यक्ष हे उपस्थित होत . आमसभेचे अहवाल वाचन पतसंस्थेचे अध्यक्ष श्री . सुनील तुकाराम जाधव यांनी केले . अहवाल वाचनानंतर टाळ्या वाजवून सभासदांनी त्यांचे स्वागत केले ,




 कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री . सुभाष देशमुख यांनी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री . सुनील जाधव व श्री . गजानन अंभोरे ( सचिव ) यांच्या कार्याची प्रशंसा केली . श्री . मनीष राठोड यांनीही याप्रसंगी संघटन व शिक्षकांची सामाजिक भुमिका याविषयी सभासदांना मार्गदर्शन केले . प्रमुख पाहुण्या सौ . सोनल ययातीराव नाईक यांनी नगरपरिषद शाळांविषयी आपली तळमळ व्यक्त करत शाळा उत्तरोत्तर चांगल्या व्हाव्यात याकरिता शुभेच्छा दिल्यात . आजच्या या कार्यक्रमांमध्ये नगरपरिषद पुसद अंतर्गत शिक्षक श्री . जिया सर , श्री . मतीन सर , श्री . उत्तम जाधव सर , श्री . शिवाजी होडगीर , श्री .अशफाक सर , श्री . अभय परत , कु . अनिता साखरे , कु . मंजिरी दहीकर यांसारख्या शिक्षकांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कारही करण्यात आला . आमसभेच्या यशस्वीतेकरीता संचालक मंडळ तर्फे श्री . हिरामण माहुरे , श्री . मारुती ठेंगल , श्री . ईफ्तेखार सर , तसेच श्री . प्रवीण कांबळे यांनी परिश्रम घेतले .

Post a Comment

0 Comments