पुसद : दिनांक २७ ऑगस्ट रोजी हॉटेल अनुप्रभा येथे ए .पी सी . आर . ची कार्यशाळा संपन्न झाली . यामध्ये ए . पी . सी . आर . चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष असलम गाझी सर , राज्यसचिव शोएब ईनामदार , प्रमुख पाहुणे नारायण क्षीरसागर सर होते . तर ए .पी.सी .आर . चे जिल्हा सचिव रसूल पटेल व जिल्हा कोषाध्यक्ष अॅड . यासीर अहेमद खान व जमाते ईस्लामी हिंदचे जिल्हाध्यक्ष नईम सर तर जमाते इस्लामी हिंदचे कार्यकारणी सदस्य अकील मिर्झा सर यांच्या उपस्थितीत पुसद येथे कार्यशाळा संपन्न झाली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड . शोएब इनामदार यांनी सादर केले त्यांनी ए . पी . सी . आर . चा परिचय करून विविध कार्य सादर केली
. प्रा . नारायण क्षीरसागर यांनी " स्वातंत्र्याचे ७५ वर्ष आणि आमची न्यायव्यवस्था " यांनी सखोल वा अभ्यासपूर्ण माहिती दिली . कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच ए . पी . सी . आर . चे राज्य अध्यक्ष असलम गाझी यांनी त्यांच्या भाषणात वर्तमान आमची न्याय व्यवस्था राजकीय दबावाखली कार्य करीत आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला कारण नुकताच बिल्कीस बानो प्रकरणी पोलिसांनी दोषींना शिक्षा देण्या ऐवजी त्यांची निर्दोष सुटका केली आणि अश्या प्रकारचे खूप प्रकरण झाली ज्या मध्ये पीडीतांना न्याय न मिळता अन्याय होतांना दिसत आहे याबद्दल चिंता व्यक्त केली . त्यांनी सांगीतले की ,ए.पी.सी.आर संघटना कोणत्याही प्रकारच्या आणि कोणत्याही समाजावर अन्याय केला जात असेल तर न्यायासाठी तत्पर आहे . आणि नेहमी मदतीसाठी पुढे राहील याची शाश्वती दिली . या कार्यशाळेत नागरिकांच्या संवैधानिक मूलभूत हक्का विषयी लोकांमध्ये जागृती करण्याकरिता प्रश्नोत्तरा द्वारे चर्चा करण्यात आली , तसेच नागरिकांना संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांची जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात पुसद येथील पत्रकार बंधू तसेच समाजकार्यात अग्रेसर असलेले विविध संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते हे सर्व उपस्थित होते . अशा प्रकारे नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या जनजागृती करिता आणि तसेच पिडीतांना मोफत न्यायालयिन मदतीकरिता ए . पी . सी . आर . चे कार्य आणि विस्तार करण्याच्या दृष्टीने पुसद येथील अनुप्रभा हॉटेल येथे शनिवारी दिनांक २७/०७/२०२२ रोजी कार्यशाळा पार पडली . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड . शोयब ईमानदार यांनी केले , तर आभार नईम सर यांनी मानले .
0 Comments