पुसद : शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणे तसेच शासकीय आस्थापना , शाळा , महाविद्यालय , बँक , हॉटेल , बार , हॉस्पिटल , रेस्टॉरंट , शॉपिंग मॉल , व अन्य दुकाने करमणुकीची ठिकाणे यांसह सर्व खासगी उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी अन्य दुकाने आहेत मात्र कोणत्याच दुकानात किंवा सार्वजनिक ठिकाणाच्या दुकानात आग नियंत्रण उपकरण दिसून येत नाही .
दरवर्षी फायर ऑडिट करणे बंधनकारक असतानाही त्याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे उघडकीस आले आहे . दरम्यान , अशा फायर ऑडिट न करणाऱ्या उद्योग व्यवसायांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहेनियमानुसार सार्वजनिक जिथे नागरिकांची रेलचेल असते तसेच संभाव्य धोके लक्षात घेता प्रत्येकानी फायर ऑडिट करून फायर यंत्र उपकरेने लावणे बंधनकारक आहे . असे असतांना सुद्धा अनेक ठिकाणी शोभेची वस्तू म्हणून उपकरणे लावलेली दिसतात.फायर ऑडिट फक्त नावापुरतेच तर नाही ना .. ? असाही प्रश्न निर्माण होत आहे . साध्या शहरात अनेक दुकानदार , दवाखाने , मद्यालये , निमशासकीय कार्यालये , शाळा महाविद्यालये यांनी सदर उपकरण बसविणे अत्यंत आवश्यक आहे . ज्यांनी ज्यांनी आग नियंत्रण उपकरणे बसविली त्यांचे तपासणी करून व इतरांनी फायर ऑडिट करून उपकरणे बसविली आहे किंवा नाही या बाबतचे नियंत्रण नगर परिषदेने ठेवावयास पाहिजे .
नुकतेच शहरातील आठवडी बाजार येथील इलेक्ट्रॉनिक एका दुकानाला अचानक आग लागली होती त्यात जीवित हानी झाली नसली तरी दुकानदाराचे मोठे नुकसान झाले . पण त्या ठिकाणी पण फायर यंत्रणा होती की नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.भविष्यात अश्या घटना घडू नये म्हणून शहरातील येथील मोठ मोठ्या शॉपिंग सेंटर , हॉस्पिटल शाळा , महाविद्यालय , सार्वजनिक शासकीय कार्यालय यांचे फायर ऑडिट करणे गरजेचे आहे . आणि ज्या ठिकाणी फक्त नावापुरते फायर यंत्रणा बसविलेली असेल त्या हॉस्पिटल , सार्वजनिक व खाजगी कार्यालय , शॉपिंग सेंटर , शाळ , महाविद्यालया वर कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे शहरातील सर्व सार्वजनिक तसेच शासकीय आस्थापना , हॉटेल , बार , हॉस्पिटल , रेस्टॉरंट , करमणुकीची ठिकाणे यांसह सर्व प्रमुख ठिकाणांची आग व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तपासणी करावी किंवा ऑडिट न करणाऱ्या सर्व संस्थांवर फायर ऍक्टनुसार कारवाई करण्यात यावी तसेच , शहरातील अग्निशमन यंत्रणा आगीच्या कुठल्याही घटनेला तोंड देण्यासाठी सक्षम आहे की नाही याचीही तातडीने तपासणी व्हावी , अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे .


0 Comments