स्थानकादरम्यान पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले आहेत. (railway accident mumbai) ही घटना शुक्रवारी रात्री 9.45 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत आतापर्यंत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मात्र, रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
डब्यांची रेलचेल, ओएचई वायर आणि ट्रॅक फिटनेसचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम आज दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कालावधीत, माटुंगा ते भायखळा ही जलद वाहतूक धीम्या मार्गावरून धावेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे सीपीआरओ यांनी दिली आहे.
या रेल्वे अपघातामुळे लोकल रेल्वेच्या वेळापत्रकातही मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे आज, शनिवारी मुंबई उपनगरीय रेल्वेवरील मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ( छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण / कर्जत/ कसारा) रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तसेच प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मध्य रेल्वेने केले आहे.

0 Comments