-->

Ads

पोलिसांनी बाईक चोरताना पकडलं; बाल सुधार गृहात आणल्यानंतर 48 तासात मुलाचा मृत्यू

 पाटना, 15 एप्रिल : बिहारमधील (Bihar News) नवादातील बाल सुधार गृहात एका 15 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला बाईक चोरीच्या आरोपाखाली पकडलं होतं. घटनेनंतर मृतदेह सदर रुग्णालयात नेण्यात आलं. जे लोक मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचले ते मृतदेह तेथेच सोडून पळून गेले. त्यांच्या गळ्याभोवती रश्शीचे दाग आहेत. मात्र मृत्यूचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. ही आत्महत्या आहे की, हत्या याचा शोध घेतला जात आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर डीएम यशपाल मीणा यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. याशिवाय पोलिसांकडून सुधार गृह आणि इतरांचीही चौकशी केली जात आहे.


मुलाने घेतला गळफास, आरडा-ओरडा केल्यानंतर कर्मचारी पोहोचले...

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण गया जिल्ह्यातील राहणारा आहे. त्याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी मोटरसायकल चोरीच्या आरोपाखील पकडलं होतं. पोलिसांनी 13 तारखेला त्याला किशोर न्यायालयासमोर हजर केलं. न्यायलयाच्या निर्देशानुसार, त्याला बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं होतं.

सुधार गृहातील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, मुलाने गळफास घेतला होता. आरडा-ओरडा ऐकल्यानंतर आम्ही पोहोचलो आणि त्याला खाली उतरवलं. तातडीने त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र येथे पोलिसांनी त्याला मृत घोषित केलं.

Post a Comment

0 Comments