-->

Ads

Pune CCTV: स्कूटीवर बसून तरुणी करत होती चॅटिंग; दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मोबाइल हिसकावला आणि...., घटना सीसीटीव्हीत कैद


 पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरच्या (Rajgurunagar Pune) भर बाजारपेठ रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणीच्या हातातून मोबाइल हिसकावून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना समोर आली आहे. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद (caught in CCTV) झाला. शहराच्या मध्यवर्ती भागातील वाडा रोड येथे रस्त्याच्या बाजुला ही तरुणी मोबाइलवर बोलत असताना पाठीमागुन दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी तरुणीच्या हातातील मोबाइल हिसकावून पोबारा केला.

यावेळी स्थानिक नागरिकांनी चोरट्यांचा पाटलाग केला. मात्र दुचाकीवरील आलेले चोरटे पुणे - नाशिक महामार्गावरुन पळुन जाण्यात यशस्वी झाले. हा चोरीचा थरार CCTV कॅमेरात कैद झाला.

या घटनेमुळे चोरटे आता भर लोकवस्तीतही चोरी करु लागल्याने पोलिसांचा वचक चोरट्यांवर राहीला नाही का? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

पुणे शहरांमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. चोरट्यांना पुणे पोलिसांचा धाकच राहिला नाही असेच या घटनेतून दिसत आहे. हातात कोयते घेऊन रस्त्यावर नागरिकांमध्ये दहशत पसरवणारे गुंड पुण्यात सक्रिय झालेत. लोहगावात सराफ व्यवसायकाच्या गळ्याला कोयता लावून लुटण्यात आलं आहे.

व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून 73 हजारांचे दागिने चोरट्यांनी लांबवले. ही घटना लोहगाव परिसरात घडली व्यवसायिकांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. ही संपूर्ण घटना ज्वेलरी शॉपमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

आझाद चौकात महाले ज्वेलर्स सराफमध्ये दोन चोरटे दुकानात शिरले त्यांनी दागिने खरेदी करण्याचा बहाना केला. एकाने सराफ व्यवसायकला कोयत्याचा धाक दाखवला तर दुसऱ्या चोरट्यांनी पकडून ठेवलं.

दरोडेखोरांनी सराफाला जीवे मारण्याची धमकी देऊन 73 हजाराचे दोन सोनसाखळ्या लांबल्या. याबाबत पोलीस तपास करत आहेत. पुणे शहरामध्ये कोयता गॅंग मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात मात्र पोलिसांचा वचक राहिलेले दिसत नाही. भरदिवसा घडलेल्या या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments