चिमुकल्या हातांनी साकारले ऐतिहासिक गडकिल्ले
जळगाव भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील देशमुख गल्ली मध्ये बालगोपालांनी शिवकालीन प्रतापगडाची उत्कृष्ट किल्ल्याची प्रतिकृती दिवाळीनिमित्त सादर केली आहे, या किल्ल्यासाठी त्यांनी टाकाऊ वस्तूचा वापर केला आहे, किल्ल्याचा बुरूज त्याच पद्धतीने किल्ल्यावर जाण्यासाठी चा मार्ग, किल्ल्यावरील तलाव, झाडे , पायथा, मावळे , ध्वज तसेच ज्या ठिकाणी अफजलखानाचा वध झाला ती जागा सुद्धा दाखवण्यात आली आहे ,
यालहान बालकांनी माती, विटा ,कागदाचा लगदा काडी कचरा आदी वस्तूचा वापर कडून उत्कृष्टपणे ही कलाकृती सादर केली आहे, ऐतिहासिक किल्ल्यांची जपणूक व्हावी व पुढील पिढीला किल्ल्याविषयी माहिती मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे . दर वर्षी दिवाळीत बालगोपाल वेगवेगळ्या किल्ल्याची निर्मिती करीत असतात व किल्ला बघण्यासाठी वरण गावातील बहुसंख्य नागरिक या ठिकाणी किल्ला पाहण्यासाठी येत आहे
बाईट किल्ला बनवणारे लहान बालक
0 Comments