-->

Ads

सलमान खानकडे पाच कोटी मागणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, झारखंडमधून आरोपीला बेड्या

Salman Khan : सलमान खानकडे पाच कोटी मागणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, झारखंडमधून आरोपीला बेड्या

Salman Khan Death Threat : लॉरेन्स बिश्नोईसोबत तडजोड घडवून आणण्याचा दावा करत सलमान खानला धमकी देत पाच कोटीची मागणी करणाऱ्या आरोपीला झारखंडमधून अटक करण्यात आली आहे.



Salman Khan vs Lawrence Bishnoi : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकावून पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्याला मुंबईच्या वरळी पोलिसांनी अटक केली आहे. धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी झारखंडमधील जमशेदपूर येथून ताब्यात घेतलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव जोहर शेख आहे, तो जमशेदपूरमध्ये भाजीविक्रेत्याचे काम करतो. त्याने अलीकडेच टीव्हीवर सलमान खानला मारण्याची धमकी दिल्याची बातमी पाहिली होती, ज्यामुळे त्याला वाटलं की सलमान खानला धमकी देऊन त्याच्याकडून पैसे उकळता येतील.

सलमान खानकडे पाच कोटी मागणाऱ्याला पोलिसांच्या बेड्या

आरोपीने मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर सलमान खानसाठी धमकीचा मेसेज पाठवला होता आणि त्यानंतर त्याने आपला मोबाइल बंद केला होता. या मेसेजमध्ये सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या सामंजस्य करवून देण्यासाठी आरोपीने पाच कोटींची खंडणी मागितली होती. मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज आल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. 

धमकी देत मागितली पाच कोटींची खंडणी

पोलिसांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो नंबर बंद होता. तांत्रिक मदतीने तपास केला असता हा मेसेज जमशेदपूर येथून आल्याचे आढळून आले. त्यानंतर जमशेदपूरमधील स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास करण्यात आला आणि आज मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.

आधी धमकी मग मागितली माफी

आधी त्याने धमकी दिली आणि नंतर काही दिवसांनी पोलिसांना त्याच व्हॉट्सॲप नंबरवरून दुसरा मेसेज आला ज्यामध्ये धमकी देणाऱ्या आरोपीने माफी मागितली. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने चुकून हा मेसेज पाठवला असून त्याबद्दल त्याला खेद वाटत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. व्हॉट्सॲप मेसेजवर धमकी दिल्यानंतर आरोपीने काही दिवसांनी माफी मागत चुकून मेसेज पाठवल्याचं म्हटलं होतं.

नेमकं प्रकरण काय?

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर आलेल्या धमकीच्या मेसेजमध्ये अभिनेता सलमान खानकडून लॉरेन्स बिश्नोईशी असलेले दीर्घकाळचे वैर संपवण्यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.

हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने दावा केला होता की, तो सलमान आणि लॉरेन्स गँगमध्ये समेट घडवून आणेल, त्यासाठी त्याने पैसे मागितले आणि जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, अशी धमकीही त्याने दिली होती.

Post a Comment

0 Comments