-->

Ads

चोरीचे दागिने खरेदी करू नका कोळसेवाडी पोलिसांचे सोनाराना आवाहन गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पोलिसांची नवीन युक्ती


कल्याण डोंबिवली शहरात घरफोड्या, सोनसाखळी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून यामुळे नागरिकां समोरच आपल्या मौल्यवान वस्तुंचे रक्षण करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कष्टाने कमावलेले धन चोरट्याच्या हाती लागल्यास सगळंच संपत असल्याने नागरिकांकडून पोलोसना दोष दिला जात आहे पोलिसांकडून चोरट्याचा मुसक्या आवळल्या जात असल्या तरी अनेक चोरट्याचा उपद्रव सतत सुरू असल्याने नागरीक त्रस्त झाले असून आपल्या वस्तूचे रक्षण करायचे कसे असा प्रश्न जनमानसा कडून विचारला जात आहे.


 यावर उपाय म्हणून कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी काल कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या ज्वेलर्स असोसिएशनची सदस्यांची बैठक घेतली या वेळी चोरटे गुन्हा केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मुद्दे मालाची विल्हेवाट लावण्यासाठी चोरी केलेले दागिने बाजारभावापेक्षा कमी किमतीत सोनारांना विकून  मोकळे होतात कमी किमतीत दागिने मिळत असल्याने सोनार या आमिषाला भुलून हे दागिने खरेदी करतात मात्र चोरटे पकडले गेल्यानंतर सोनार अडचणीत येत असल्याने सोनारानी चोरीच्या दागिन्यांची खरेदी करू नये असे आवाहन शेख यांनी ज्वेलर्स असोसिएशनच्या सदस्यांना करत  प्रत्येक ज्वेलर्सने सुरक्षा रक्षक नेमावेत दुकान आणि दुकानासमोरील सीसीटीव्ही अपडेट ठेवाव्यात संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांना सतर्क करावे यासारख्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या तर या बैठकीत ज्वेलर्स असोसिएशने  पोलिसांनाही  बीट मार्शल व प्रत्येक दुकानावर बुक अद्ययावत ठेवण्याची मागणी करत  बीट मार्शल नियमित या परिसरात भेटी देऊन बीट बुक मध्ये त्याची नोंद करावी अशी मागणी सोनाराकडून केली गेली असून पोलिसाच्या योजनेमुळे भविष्यात वाढती गुन्हेगारी थांबण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.


Post a Comment

0 Comments