-->

Ads

एक हात मदतीचा.. महागाव तहसीलचे कर्मचारी सरसावले पुढे..




यवतमाळ जिल्ह्य़ातील महागाव तालुक्यातील गुंज साझ्यातील सारकिन्ही गाव.

हरिदास वय 10 कोमल वय 8 कुणाल वय 6 या चिमुकल्यांचे वडिल शिवाजी डाखोरे सन 2018 साली आत्महत्या करून मरण पावला.मजूरदार असल्याने शासकीय लाभ भेटला नाही.आई गिरजाबाई या चिमुकल्यांना घेउन माहेरी तीन वर्षे राहीली.भावांचा आधार न मिळाल्याने ऑगस्ट 2021 ला परत सासरी आली. संजय गांधी निराधार योजनेची आवश्यक कागदपत्र तयार करून दि.9/9/2021 ला तहसील महागाव येथे सादर केलेत.आणि अवघ्या विस दिवसानंतर आई गिरजाबाई किरकोळ आजारी पडली व वैद्यकीय उपचाराकरिता पैसे नसल्याने ती देखील दि.29/9/2021 ला मरण पावली.आणि ही छोटी छोटी बालके उघड्यावर पडली.कुटूंबात 65 वर्षाचे वरिल आजी जी कोणताही कामधंदा करण्यास असमर्थ असल्याने नाईलाजास्तव ही बालके लोकांचे शेतात किलो दोन किलो कापूस वेचायला जावून आपली गुजरान करित आहेत. ही बाब महागाव तहसील चे तलाठ्यांना समजताच दिवाळीपूर्वी या अनाथांना कपडे लते घेउन व दिवाळीचे मिष्टान्न घेउन त्यांना मदतीचे आश्वासन दिले.सरकार मोफत राशन देतो.आज उपाशी कोणीही मरत नाही.कुत्रे मांजरे देखील आपले पोट भरतात.तशीच ही अनाथ बालके देखील आपले पोट कसेबसे भरून घेणारच आहे.पण आज त्यांचे भविष्य अंधकारमय झाल्यागत दिसून येत आहे.

दुःखात व दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थणेला जोडलेल्या दोन हातापेक्षा उपयुक्त व श्रेष्ठ असतो.या आवाहनाला प्रतिसाद देत गुंज परिसरातील दानशूर दात्यांनी मदतीचे हात पुढे केले आहे.

  आपणही आपली अल्पशी मदत देउन या चिमुकल्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी अनाथाचे नाथ होउया.

मदतीकरिता 

सेंट्रल बँक ऑफ सवना

IFSC cODE: CBIN0282049

Ac no.5162367208 मो नं 8766693809

Name.  शांताबाई मारोती डाखोरे या अकाउंटला पैसे पाठवून आपण अनाथाच्या नाथ होऊ शकता असे आव्हान महसूल विभाग व तलाठी संघटनेतर्फे करण्यात आलेला आहे

महागाव प्रतिनिधी :-संजय जाधव

Post a Comment

0 Comments