-->

Ads

दिवाळी पुर्वी जास्तीत जास्त लसिकरण करा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आव्हान




उमरखेड प्रतिनिधी :- संजय जाधव

 उमरखेड :-३०ऑक्टोंबर जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हापरीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यानी आर्णी महागाव व उमरखेड तालुक्यातील विविध गावाना भेट देउन नागरीकाना दिवाळी पुर्वी जास्तीत जास्त कोवीड लसिकरण करुन घेण्याचे आवाहन केले आहे, तसेच यत्रनेला मोठ्या प्रमाणात कोरोना लसिकरण शिबीराचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहे,


जिल्हाधिकारी यांनी आर्णी तालुक्यातील लोणी गावातील ग्रामपचायत आरोग्य उपकेंद्र येथे भेट देऊन कोवीड लसिकरणा बाबत विचरणा केली नंतर  ग्रामपंचायत कोसदनी वृक्षरोपन केले, मुकुंदपुर अनंतवाडी आनंद नगर या गावाना भेटी देऊन, लसिकरणा बाबत आढावा घेतला नंतर महागाव तालुक्यातील खड़का ,कलगाव पुलिस स्टेशन महागाव लसिकरण सत्राला भेटि दिल्या 


नंतर उमरखेड तालुक्यातील सुकळी, नागेशवाडी, मरसुळ, नागापुर (प), दिवट पिंपरी व पुसद मधिल गौळ येथे भेट देऊन लसिकरणा बाबत आढावा घेतला, यावेळी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड़  ,महागाव तहसिलदार विशंभर राणे, उमरखेड तहसिलदार आनंद देऊळगावकर  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी एस चव्हाण उपमुख्यकार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे जिल्हा लसिकरण अधिकारी डॉ सुहास कोरे गटविकास अधिकारी श्रीमती वाघमारे  राजेंद्र सिंग गौतम तालुका आरोग्य अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments