-->

Ads

धक्कादायक! पत्नीने पतीचा खून करून मृतदेह घराबाहेरच पुरला, कारण ठरलं...

 


हैदराबादमध्ये (Hyderabad) पत्नीनेच आपल्या दुसऱ्या पतीची (Wife killed Husband) चाकूने भोसकून हत्ता केली. त्यानंतर तिने त्याचा मृतदेह जमिनीत पुरला. मुलीची छेड काढतो, म्हणून पत्नीने हे टोकाचं पाऊल उचललं.
  हैदराबाद, 11 मार्च : लहान मुलींना चांगला स्पर्श, वाईट स्पर्श काय असतो, हे शिकवायला हवं असं अनेकदा माध्यमांतून सांगितलं जातं. घरातील लहान मुले किंवा मुली यांच्याशी घरातीलच एखादी मोठी व्यक्ती लैंगिक चाळे करते आणि त्यांना धमकवून गप्प बसायला लावते. अगदी सुशिक्षित उच्चभ्रू म्हणवणाऱ्यांच्या घरांतही असे प्रसंग अनेकदा घडतात. अशीच एक घटना हैदराबाद (Hyderabad) मध्ये घडली आणि त्यामुळे पत्नीनेच आपल्या दुसऱ्या पतीची (Wife killed Husband) चाकूने भोसकून हत्ता केली. त्यानंतर तिने त्याचा मृतदेह जमिनीत पुरला अशी माहिती पोलिसांनी दिली.

  हैदराबादमध्ये (Hyderabad) पत्नीने पतीची चाकूने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलींसोबत गैरवर्तन केल्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने पतीची हत्या केली. हत्येनंतर महिलेने पतीचा मृतदेह घराच्या कपाउंडजवळ असलेल्या भिंती शेजारी खड्डा खोदून पुरला. याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. एनडीटीव्हीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  पॉर्न व्हिडीओ दाखवून पतीचे हात खुर्चीला बांधले अन् चिरला गळा, नागपुरातील घटना

  हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, '8 आणि 9 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 32 वर्षीय महिलेने आपल्या 38 वर्षांच्या पतीवर दारुचे सेवन करत असताना चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या पतीचा जागीच मृत्यू झाला. या महिलेचा हा दुसरा पती होता. पहिल्या पतीपासून तिला असलेल्या मुलींशी गैरवर्तन करत असल्याच्या रागातून तिने दुसऱ्या पतीची हत्या केली.'


  या घटनेनंतर हत्या झालेल्या व्यक्तीच्या भावाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हत्या केल्याच्या संशयावरुन आणि मृतदेह गाडल्याप्रकरणी महिलेला ताब्यात घेतले. पोलिसांनी महिलेची कसून चौकशी केली असता तिने पतीची हत्या केली असल्याची कबुली दिली.

  या महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचं पहिलं लग्न झालं होतं. पहिल्या पतीपासून तिला पाच मुलं आहेत. पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिनं जून 2020 मध्ये दुसरं लग्न केलं. पण तिचा दुसरा पती तिच्या मोठ्या आणि लहान मुलींसोबत गैरवर्तन करायचा. त्यामुळेच तिनं त्याची हत्या केली.' पोलिसांनी महिलेच्या पतीचा गाडलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेविरोधात आयपीसीच्या कलम 302 आणि 201 अंतर्गत गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.


  Post a Comment

  0 Comments