पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय आदित्य सीताराम कॉलनीत राहत होता. बुधवारी त्याचे वडील विजय सिंह रात्री उठले तर आदित्यच्या खोलीचा दिवा सुरू होता. त्यांनी डोकावून पाहिलं तर आदित्य पंख्याला लटकला होता. यानंतर कुटुंबीय दार तोडून आत गेले आणि आदित्यला रुग्णालयात दाखल केलं. येथे डॉक्टरांनी आदित्यला मृत घोषित केलं.
13 फेब्रुवारी रोजी वाढदिवशी मागितला होता मोबाइल...
तपास अधिकारी राजकुमार सिंह यांनी सांगितलं की, आदित्यला पब्जीचं वेड होतं. त्याच्या वडिलांनी सुरुवातील मोबाइल देण्याचं वचन दिलं होतं. मात्र वाढदिवशी मोबाइल मिळाला नसल्यानं आदित्यला वाईट वाटलं. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर आदित्य आपल्या खोलीत झोपायला गेला. रात्री उशिरा आदित्यने आईच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अभ्यासात होता हुशार...
आदित्यच्या वडिलांनी सांगितलं की, तो अभ्यासात हुशार होता. तो आपल्या आजोबांच्या मोबाइलवरुन ऑनलाइन क्लास अटेंड करीत होता. त्यानंतर तासनतास पब्जी खेळत असे. पब्जीवरुन त्याला अनेकदा बोलणी खावी लागत होती. याच कारणास्तव वडिलांनी त्याला मोबाइल विकत घेऊन दिला नव्हता. यामुळे नाराज आदित्यने आत्महत्या केली.
0 Comments