-->

Ads

इन्स्टावर तिचे रोज फोटो यायचे… तिच्या प्रेमात तो अक्षरश: वेडा झाला, पण तीन गोष्टी कळताच… काय घडलं त्या झुडूपांमागे?

 मैनपुरी येथे 52 वर्षीय महिला रानीची तिच्यापेक्षा निम्म्या वयाच्या प्रियकराने हत्या केली. इंस्टाग्रामवर झालेले प्रेम दीड वर्षात दुश्मनीत बदलले. रानीने वयाचा अंदाज लावू नये म्हणून फिल्टर वापरले होते. पैसे परत करण्याबाबत आणि लग्नाच्या दबावामुळे अरुणने राणीचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी अरुणला अटक केली आहे आणि त्याच्याकडून रानीचे मोबाईल जप्त केले आहेत.




उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे राहणारी एक महिला तिच्यापेक्षा निम्म्या वयाच्या तरूणाच्या प्रेमात पडली. इन्स्टाग्रामद्वारे दोघे जवळ आले. मात्र ती महिला इन्स्टाग्रामवर फिल्टरचा वापर करायची त्यामुळे त्या तरूणाला तिच्या वयाचा अंदाजच आला नाही. पण अवघ्या दीड वर्षांच्या आतच त्या महिलेचं प्रेम, तिचा प्रियकर हाच तिच्या आयुष्याचा दुश्मन बनला. ती ज्याच्यावर प्रेम करत होती, त्यानेच गळा दाबून तिची हत्या केली. सुमारे महिन्याभरानंतर या हत्याकांडातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हा खून नेमका का केला यामागची सगळी कहाणी त्याने सांगितली.

खरंतर, मैनपुरीच्या ठाणे कोतवाली परिसरात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. रानी असं मृत महिलेचं नाव होतं. ती मूळची फारुखाबादची रहिवासी होती. तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे पुष्टी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये झाली. मात्र या ब्लाईंड मर्डर केसची उकल करण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली. सखोल चौकशीनंतर पोलिसांनी आरोपी अरुण राजपूतला अटक केली. आरोपीने इन्स्टाग्रामद्वारे महिलेशी मैत्री केली होती. चौकशीदरम्यान अरुणने सांगितले की, रानी या महिलेने तिचे वय लपवण्यासाठी फिल्टर्सचा वापर केला.

मैनपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला राणी (वय 52) आणि आरोपी अरुण राजपूत ( वय 26) यांची सुमारे दीड वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर मैत्री झाली. राणीला चार मुलंही आहेत. सोशल मीडियावर झालेल्यामैत्रीनंतर दोघांमध्ये पैशाचे व्यवहार सुरू झाले. एसपी सिटी अरुण कुमार सिंह म्हणाले की, राणीने तिचं वय लपवण्यासाठी इंस्टाग्रामवर फिल्टर वापरला होता, ज्यामुळे आरोपी तिच्या जाळ्यात अडकला. नंतर, राणीने लग्न करण्यासाठी आणि तिने दिलेले दीड लाख रुपये परत करण्यासाठी अरुणवर दबाव आणण्यास सुरुवात केली.

या कारणांमुळेच केली हत्या

राणीच्या सततच्या दबावामुळेआपण त्रस्त झालो होतो, असं आरोपीने पोलिसांना सांगितलं. अखेर 1० ऑगस्ट रोजी त्याने राणीला मैनपुरी येथे बोलावले. दोघेही खारपरी बांबा जवळील झुडपात भेटले, जिथे राणी त्याच्याशी पुन्हा लग्नाबद्दल आणि पैसे परत करण्याबद्दल बोलली.मी पोलिसात तक्रार करेन अशी धमकीही तिने दिली. अखेर संतापाच्या भरात अरूणने राणीचीच ओढणी घेऊन तिचा गळा दाबून तिची हत्या केली आणि तो तिथून फरार झाला. त्येनंतर आरोपीने महिलेच्या मोबाईलमधून सिम कार्ड काढून ते फेकून दिले. याप्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी राणीचे कॉल डिटेल्स तपासले असता, अरूण बद्दल समजलं.

सध्या पोलिसांनी आरोपी अरुण राजपूतला अटक केली आहे. त्याच्याकडून राणीचे दोन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केल्याचे एसपी सिटी यांनी सांगितले. हत्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Post a Comment

0 Comments