Crime News: भाचीच्या साखरपुड्याच मामा ठरला विलन, एकतर्फी प्रेमामुळे नको ते घडलं, ॲसिड हल्ल, गोळीबार त्यानंतर..., घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे... तर घटना स्थळावरुन पोलिसांना एक बंदूक देखील जप्त केली आहे.
आजच्या कलियुगात कोणाच्या मनात काय असेल काहीही सांगता येत नाही… कोण कधी कोणाचा कसा घात आणि विश्वासघात करेल याबद्दल देखील काही सांगता येत नाही… आता देखील असंच काही घडलं आहे. एकतर्फी प्रेमात मामान चक्क भाचीवर हल्ला केला आहे. हिंदू धर्मात मामा आणि भाचीच्या नात्याला फार महत्त्व आहे… पण येथे मामा चक्क भाचीवर ॲसिड हल्ला केला. ज्यामुळे जखमी झालेल्या तरुणीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे मामाने आपल्या भाचीच्या साखरपुड्याच्या दिवशी तिच्या चेहऱ्यावर ॲसिड हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला आणि चकमकीनंतर त्याला अटक केल्याची माहिती देखील समरे आहे…
विधी सुरु असताना केला ॲसिड हल्ला
ही घटना भदोहीच्या औरई पोलीस स्टेशन परिसरातील बारी गावातील आहे. शनिवारी 19 वर्षीय तरुणीचा रोका म्हणजे साखरपुड्या आधी होणारी विधी सुरु होती. त्याच दरम्याव तरुणीचा मामा मुकेश त्याठिकाणी पोहोचला आणि स्वतःच्या भाचीवर ॲसिड हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश याचं भाचीवर एकतर्फी प्रेम होतं. भाचीचं लग्न होत असल्यामुळे त्याला प्रचंड राग आला आणि विधी सुरु असताना खिडकीतून त्याने भाचीवर ॲसिड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तरुणीचे गाल आणि हात पूर्णपणे भाजले होते. हल्ल्यानंतर तरुणीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जेथे प्राथमिक उपचार करुन तरुणीला घरी पाठवण्यात आलं…
घटनेचा माहिती पोलिसांपर्यत पोहोचल्यानंतर त्यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस अधीक्षक अभिमन्यू मांगलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं होतं. पोलिसांनी सहसेपूरमधील रेल्वे ट्रॅकजवळ आरोपीला घेरले. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने गोळीबार सुरू केला. अशात पोलिसांनी आरोपीच्या पायावर गोळी झाडली आणि त्याली अटक केली. घटना स्थळावरुन पोलिसांना एक बंदूक देखील जप्त केली आहे.
आरोपीने याआधी देखील केलं आहे असं…
समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी मुकेश विवाहित आहे आणि त्याला दोन मुलं देखील आहे. तीन महिन्यांपूर्वी त्याला गावात असं कृत्य करताना पकडण्यात आलं होतं. गावकऱ्यांनी त्याला मारहाण देखील केली. तेव्हा चूक स्वीकारत पुन्हा असं करणार नाही… असं वचन दिलं… पण तो थांबला नाही. यावेळी त्याने आणखी एक भयंकर गुन्हा केला आहे.
0 Comments