-->

Ads

भिवंडी लोकसभा मतदारसंघात नक्की हवा कुणाची ???

तिरंगी लढतीमध्ये कोणाचं पारडं आहे जड ???


निलेश सांबरे करणार कपिल पाटलांचा पराभव???

भिवंडी लोकसभा मतदार संघात होऊ घातलेल्या तिरंगी लढतीकडे सध्या संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. दोन मातब्बर राजकारण्यांची, एका नवख्या पण प्रभावशाली उमेदवाराने चांगलीच गोची केली आहे. सध्या भिवंडी मतदारसंघात चर्चा आहे ती जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांची. त्यांनी अत्यंत कमी वेळात आपण केलेल्या समाजकार्याच्या जोरावर संपूर्ण लोकसभा परिक्षेत्रात चांगलीच लोकप्रियता मिळवली असल्याचं दिसून येत आहे. त्यातच विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि मविआचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना ही निवडणूक कठीण जाणार असे चिन्ह दिसत आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी ही निवडणूक सर्वसामान्य जनतेच्या मुद्द्यांवर लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कपिल पाटील आणि बाळ्या मामा यांनी गेल्या कित्येक वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार आणि शेती या मुद्द्यांवर काही कामेच केलेली नसल्यामुळे त्यांना नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे निलेश सांबरे यांनी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून या पाच क्षेत्रात, कोणतेही सत्तापद नसतांनासुद्धा, अत्यंत भरीव अशी कामगिरी मागील पंधरा वर्षात केली आहे. त्यामुळे मतदारांचा सांबरे यांना वाढता प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

केंदीय मंत्री कपिल पाटील हे २०१४ मध्ये प्रचंड मोदी लाटेमुळे काँग्रेसचा पराभव करून विजयी झाले आणि त्यानंतर पुन्हा २०१९ मध्ये ते निवडून आले. त्यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले. कपिल पाटलांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्याने जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्यांना वाटले की आता भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सहजासहजी मार्गी लागतील. परंतु असे काहीही न घडल्याने जनतेच्या सर्व अपेक्षा धुळीस मिळाल्या. आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या शिक्षण, पाणी, वीज यासारख्या मुलभूत पश्नांवर कपिल पाटलांनी काय भूमिका घेतली आणि हे प्रश्न सुटतील यासाठी काय प्रयत्न केले? तसेच भिवंडी लोकसभा परीक्षेत्रातीलाच भिवंडी, शहापूर, वाद, मुरबाड तालुक्यातील ग्रामीण  भागात भेडसावणाऱ्या भीषण पाणी टंचाईवर त्यांनी काय उपाययोजना केल्या? असे प्रश्न सध्या मतदार विचारात आहेत. यासोबतच भिवंडी शहराचं झालेलं विद्रुपीकरण, ट्रॅफिकची समस्या, गोडाऊन झोनमुळे निर्माण झालेल्या समस्या, भिवंडीतील टोरँट कंपनीच्या मनमानी कारभारामुळे जनतेला होणारा त्रास कपिल पाटलांना इतके वर्षं दिसला का नाही? असा संतप्त सवालही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहे.

त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील दुसरे तगडे उमेदवार म्हणजे मविआचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात सर्व ताकदीनिशी उतरले आहेत. बाळ्या मामा हे अनेकवेळा पक्षांतर करून सत्ता उपभोगणारे नेते म्हणून भिवंडी मतदारसंघात प्रचलित आहेत. तसेच त्यांनी भरवलेल्या क्रिकेट सामन्यांना राज्यातील अनेक संघ हजेरी लावत असतात. पण क्रिकेट सामने भरवण्याव्यतिरिक्त त्यांनी कोणतेही रचनात्मक आणि समाजोपयोगी कामे केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षात स्थिरस्थावर नसतांनाही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातर्फे त्यांना दिलेल्या उमेदवारीने माविआचे अनेक मित्रपक्ष नाराज झाल्यचे दिसून आले. तसेच जनतेलाही बाळ्या मामा यांच्याकडून काही खास अपेक्षा आहेत असे चिन्ह दिसत नाहीत. 

अशा परिस्थितीत निलेश सांबरे यांनी भिवंडी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यामुळे प्रस्थापित राजकारण्यांना आपली रणनीती बदलायला भाग पाडले आहे. जी निवडणूक अगोदर धार्मिक आणि अन्य देश पातळीवरील मुद्द्यांवर होणार होती ती निवडणूक प्रथमच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर होणार आहे. त्यामुळे निलेश सांबरे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वेगळेच रंग भरल्याचे पाहायला मिळत आहे. या तीनही उमेदवारांमध्ये तुलना केली असता समाजकार्याच्या बळावर निलेश सांबरे याचं पारडं जड आहे. सांबरे मागील १५ वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगार आणि शेती या विभागांमध्ये अनेक समाजकार्ये करत आहेत. त्यामुळे प्रस्थापित राजकारण्यांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments