कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या विजय निर्धार यात्रेची सध्या जोरदार चर्चा असून सलग सहाव्या दिवशी देखील कल्याण ग्रामीण मधील विविध भागात लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाह्यला मिळाला . ठिकठीकाणी निलेश सांबरे यांचे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. फळेगावात पोचल्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात निर्धार यात्रेचे येथील ग्रामस्थांनी स्वागत केले गेले. या उत्स्फूर्त प्रतिसादाने आपण भारावून गेलो असून हा विश्वासच माझा विजय निश्चित करेल अश्या भावना सांबरे यांनी व्यक्त केल्या .
निलेश सांबरे यांची विजय निर्धार यात्रा सोमवारी सकाळी कल्याण मधील रायता येथून सुरु झाली. त्यानंतर गोवेली, घोटसई, रुंदे मार्गे फळेगाव येथे पोचली. फळेगावातील नागरिकांनी निर्धार यात्रेचे टाळ-मृदुंगाच्या गजरात भजन गात गात मोठ्या उत्साहाने स्वागत केले. तसेच घोटसई मधील पंचशील नगर येथे निलेश सांबरेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. यावेळी निलेश सांबरे यांच्यासाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
दानबाव, नडगाव मार्गे खडवली विभागात ही यात्रा पोहचल्यानंतर अचानक पावसाने हजेरी लावली. जोरदार पाऊस आणि वाऱ्यातही अनेक नागरिक सांबरे यांना भेटण्यासाठी गर्दी करून उपस्थित होते. या गर्दीत सांबरे यांना भेटण्यासाठी एक दिव्यांग बांधव भर पावसात थांबला होता. सांबरे यांना हे समजताच त्यांनी अगदी आपुलकीने या दिव्यांग बांधवाशी संवाद साधला . या भेटीनंतर त्या दिव्यांग बांधवाने “आम्ही सर्व सदैव तुमच्यासोबत असू !!!” असा सांबरे यांना विश्वास दिला . सांबरे यांच्या विजय निर्धार यात्रेला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद हा सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे .
0 Comments