-->

Ads

पुसद येथील अखेर कै. शेषेराव पाटील व प्रेसिंग सहकारी संस्थेच्या वादग्रस्त खरेदी विक्री व्यवहाराला अखेर स्थगिती


प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर

पुसद : येथील कै . शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थेच्या वादग्रस्त जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारा संदर्भात अल्पसंख्याक विकास व पणन महासंचालनालय पुणेचे सहसचिव डॉ.सुग्रीव धोपटे यांनी स्थगिती दिल्याबद्दल दि . ४ मार्च २०२४ रोजी पत्र दिले होते . त्याच आधारावर यवतमाळ येथील जिल्हा उपनिबंधकाला पणन संचालक विकास रसाळ यांनी दि .७ मार्च २०२४ रोजी पत्र दिले आहे . पत्रात जमिनीचा झालेला खरेदी विक्रीच्या व्यवहारास स्थगिती दिल्याचा उल्लेख आहे . त्या पत्रात सर्व तपशील सर्व संबंधित दस्तऐवज ताब्यात घेण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल तात्काळ संबंधित कार्यालयाला सादर करण्यात यावा तसेच नमुद संस्थेच्या जमिनीचा खरेदी विक्री व्यवहाराची चौकशी पूर्ण होत नाही , तोपर्यंत सदर जमिनीची कोणत्या प्रकारची विकास कामे , बांधकाम होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यासह पुसदच्या न.प. कार्यालयाचे मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे कळविण्यात आले असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक बाबर यांनी त्यांच्या कार्यालयात दि . ११ मार्च २०२४ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे . दि . ७ जुलै २०२३ रोजी व इतर तक्रार तत्कालीन पणन संचालक एस.कोथमिरे यांच्या आदेशानुसार अमरावती येथील उपविभागीय उपनिबंधक विनायक कहाळेकर यांनी दि . ३० जानेवारी २०२४ नुसार सर्व चौकशी करून तो अहवाल दिला होता . त्या अहवालात तक्रारदाराचे मुद्दे ग्राह्य धरले आहे . त्यावर संचालकाचा निर्णय होणे बाकी आहे हे विशेष . तक्रारदारांनी दि . १३ डिसेंबर २०२२ पासून तर आज पर्यंत संबंधित कार्यालयात सतत पाठपुरावा केला आहे . त्यामुळे संस्थेच्या सभासदांनी तक्रारदारांना यापुढेही सहकार्य करावी अशी मागणी केली आहे . कै . शेषराव पाटील जिनिंग प्रेसींग सह संस्था पुसद ची सदर १० एकर जमीन ही काही महिन्यांपूर्वी नागपूर च्या प्लास्टो कंपनी ला ३५ कोटी एक लाख रुपया त आन दी रेकॉर्ड विकून आफ दी रेकॉर्ड सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती अशी सर्वत्र चर्चा सुरू होती . फेरफार नंतर सदर कंपनीने हीच जमीन २०० कोटी १४ लाख रुपयांत एका बिल्डरला विक्री करीत ईसार म्हणून १०० कोटी रूपये घेतल्याची खात्रीलायक माहिती असून त्या बिल्डरने त्या जमीनीवर प्लाट पाडीत सुमारे १८००० रुपये प्रती चौरस फूट भावाने काही प्लाटची विक्री सुद्धा केली आहे . परंतु या आदेशाने सर्वच देवाणघेवाण करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पुढे काय कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

Post a Comment

0 Comments