-->

Ads

पुसद तालुक्यातील आडगांव येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा अनावरण सोहळा

विधानसभा उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवळ याच्या हस्ते होणार अनावरण


प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर:तालुक्यातील पाहिला पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा मान आडगावला.सप्तखंजेरीवादक पंकजपाल महाराज यांच्या जाहीर  प्रबोधनाचा कार्यक्रम.सर्व बांधवांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला उपस्थित राहून साक्षीदार व्हावे  -  सुनिल ढाले 

पुसद : अवघ्या वयाच्या 25 वर्षात शोषित , पिढीत घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी उलगुलान चा नारा देत ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आदिवासी जननायक क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांचा पुसद तालुक्यातील पहिला भव्य पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी वेळ दुपारी 1.00 वा. स्थळ : श्री मुंगसाजी संस्थान,आडगाव ता. पूसद जी. यवतमाळ येथे पार पडणार आहे. 

हा अनावरण सोहळा विधानसभेचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवळ साहेब यांच्या शुभहस्ते तर आमदार इंद्रनिल नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विशेष उपस्थित मध्ये आदिवासी समाजाचे नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब , विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी , माजी आमदार डॉ संतोष टारफे , से. नी. उपायुक्त माधवराव वैद्य , सौ. मोहिनीताई नाईक , जितेंद्र मोघे , प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे , बाळासाहेब पाटील कामारकर , बी.जी. राठोड सर , सदबाराव मोहटे , सुरेश धनवे , रंगराव काळे , ज्ञानेश्वर तडसे , गट विकास अधिकारी संजय राठोड , खंडाळा ठाणेदार देविदास पाटील , बाबुसिंग आडे , दिलीप पारध , गजानन उघडे , साहेबराव धबाले , आशाताई पांडे , राजेश ढगे , पांडुरंग व्यवहारे , मोतीराम बोडखे , बाळू वंजारे,  आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी , नारायण कऱ्हाळे , शामराव व्यवहारे , प्रकाश झळके , डॉ. शिवाजी भुरके , केशव मस्के,  विशाल झामरे , किरण मिरासे, लक्ष्मण टारफे , संजय डुकरे , गजानन फोपसे ,  श्रीकांत चव्हाण , अर्जुन हगवणे , रामदास भडंगे सह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. स्वागोत्सुक आणी मुख्य आयोजक ऍड. सुनिल ढाले यांच्या 

पुढाकाराने आणी गावकऱ्यांच्या सहकार्याने हा सोहळा घेतला आहे. दरम्यान सप्तखजेरीवादक पंकजपालं महाराज यांचा जाहीर प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे, बिरसा मुंडा यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी प्रबोधनाची मेजवानी होणार आहे . तसेच ग्राम पंचायत आडगाव अंतर्गत स्व.सुरेश वंजारे व्यापार संकुलाचे 10 दुकानगाळ्याचे लोकार्पण सुद्धा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे .मागील एक महिन्यापासून या अनावरण सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांचे कार्य , विचार प्रत्येक घरा घरात जावे आणी त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सर्वांच्या हातून समाजिक सेवा घडावी या उद्दात्त हेतून अनावरण सोहळा आयोजन समितीने नियोजन केल्याचे अध्यक्ष सुनिल ढाकरे, सुनील वंजारे , विक्की वंजारे , आश्विन मुकाडे,प्रदीप काळे , बाळू सुनील,अनिल ढाले  यांनी केले आहे. जिल्ह्यातील हजारो बांधवांनी या ऐतिहासिक अनावरण सोहळ्याला उपस्थित असे आवाहन ऍड. सुनिल ढाले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments