-->

Ads

पुसद तालुक्यातील बालवाडी येथील जंगलात वाघांनी पाडला बकरीचा फडशा

प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर:सविस्तर माहिती असी की बालवाडी येथील जवळच्या जंगलात  

वन्यप्राण्याने जंगलात चरणाऱ्या एका बकरीवर हल्ला करून तिचा अक्षरश : फडशा पाडला . ही घटना आज ३ फेब्रु , रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान बाळवाडी शिवारात घडली आहे . बाळवाडी येथील गुराखी सदाशिव भोरकडे हे आज सकाळी ११ वाजता ४० बकऱ्यांना चरण्यासाठी जंगलात घेऊन गेला असता एका बकरीवर वन्यप्राण्याने हल्ला करून तिला ठार केले . बकऱ्यांची भेदरलेली अवस्था पाहून इकडे तिकडे शोध घेत असताना दुपारी दोन वाजता बकरीचा फडशा पाडल्याचे गरख्याला दिसून आले . व बकरी मालकाचे नाव अनुसया  मिराशे असून बालवाडी येथील रहिवासी असून विधवा महिला आहे तिची परिस्थिती अतिशय गरिबीची आहे गावातील नागरिकांनी वन विभाग अधिकारी यांना दूरध्वनीद्वारे कळविले असता आतापर्यंत वन विभागाचा अधिकारी कोणताही आला नाही व कोणताही पंचनामा केलेला नाही पंचनामा करून या गरीब महिलेला नुकसान भरपाई देण्याचे गावकऱ्यांची मागणी आहे सविस्तर लेखी तक्रार वन विभाग शेंबाळ पिंपरी यांना देण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments