-->

Ads

गोमांस वाहतूक करणाऱ्या दोन इसमास पिकप टेम्पो सह ताब्यात घेऊन केले जेरबंद यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर : पुसदः यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे , आरोपी शोध , अवैध जनावर तस्करी व मांस वाहतुक धंद्याचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलीस अधीक्षक डॉ . पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते 

त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत . दिनांक ०३/०२/२०२३ रोजी सहा . पोलीस निरीक्षक गजानन गजभारे , स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद - उमरखेड उपविभागात जिल्हा दरोडा प्रतिबंधक रात्रगस्ती पेट्रोलींग करीत असतांना मुखबीरव्दारे गोपनिय माहीती प्राप्त झाली कि , मंगरुळपिर जि . वाशिम येथे एक पिकअप बलोरा वाहन क्रमांक एमएच - ३७ - टी -२५ ९ ४ यामधून बैल / गायी ( गोमांस ) कत्तल करुन मानोरा , दिग्रस , सिंगद , पुसद , शेंबाळपिंप्री मार्ग निजामाबाद येथे घेवून जात आहे अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने नमूद खालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचाना सोबत घेवून खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील हिवळणी पालमपट गावाजवळ रोडवर सापळा लावून नाकाबंदी केली असता पुसद बाजूकडून संशयीत पिकअप बलोरो येत असल्याचे दिसून आल्याने त्यास रोडच्या बाजूला थांबवून त्याची पंचा समक्ष पाहणी केली असता सदर पिकअप बलोरो वाहन क्रमांक एमएच - ३७ - टी- २५ ९ ४ या मध्ये लोखंडी टाकी , त्यावर फळ विक्री व वाहतुक करीता उपयोगात येणारे कॅरेट ठेवून त्याचे खाली लोखंडी टाकी त्यामध्ये १५ ते १६ बैलांचा ( गोमांस ) मांस मिळून आल्याने सदर टेम्पो चालक १ ) मोहम्मद कलीम अब्दुल गणी वय ३६ वर्ष , २ ) मोहम्मद शहजाद मोहम्मद अकिल वय २१ वर्षे , दोन्ही रा . मंगरुळपिर जि . वाशिम असे असून सदरचा बैलाचे मांस शेख इरशाद शेख वजिर रा . टेकडी पुरा अक्सा मस्जीद , जवळ कसाबपुरा मंगरुळपिर जि . वाशिम यांच्या सांगण्यावरून निजामाबाद येथे घेवून जात असल्याचे सांगितल्याने पिकअप बलेरो वाहन , तसेच २०१० किलो मांस ( गोवंश ) , एक मोबाईल असा एकूण १४,१०,००० / - रुमाल जप्त करुन वरील इसमांविरुध्द पोलीस स्टेशन खंडाळा येथे गुन्हा करण्यात आलेला आहे . सदरची कारवाई वरिष्टांच्या मार्गदर्शनात सपोनि , गजानन गजभारे , पोउपनि रेवन जागृत पोहवा तेजाब रणखांब , पोहवा सुभाष जाधव , कुणाल मुंडोकार , रमेश राठोड , पोशि सुनिल पंडागळे , मोहम्मद ताज सर्व स्थानिक गुन्हे शाखा , यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे .


Post a Comment

0 Comments