गर्भवती पत्नीला बेदम मारहाण करुन तिचे कपडे फाडून तिला गावभर फिरवल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित महिलेचा आक्रोश सुरू होता. घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी तिघांना अटक केली.
जयपूर: राजस्थानच्या प्रतापगढ जिल्ह्यात भयंकर घटना घडली आहे. एका गर्भवती आदिवासी महिलेला निर्वस्त्र करुन फिरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कामाला लागले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या आदेशानंतर पोलीस महासंचालक उमेश मिश्रा यांनी शुक्रवारी रात्री सुत्रं फिरवली. त्यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक (गु्न्हे) दिनेश एम. एन. यांना प्रतापगढला पाठवलं. या प्रकरणात आज सकाळी तिघांना अटक करण्यात आली.
धरियावद पोलीस ठाण्याचे प्रभारी पेशावर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला २१ वर्षांची आहे. पहाडी गावात राहणाऱ्या महिलेला तिच्या पती आणि नातेवाईकांनी मारहाण केली. त्यानंतर तिला निर्वस्त्र करुन गावभर फिरवलं. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांना खडबडून जाग आली. महिलेचा पती कानासह तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची दख घेत मुख्यमंत्री गेहलोत यांनी पोलीस महासंचालक उमेश मिश्रा यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. मिश्रा यांनी जयपूरचे एडीजी दिनेश एम. एन. यांनी काल रात्री उशिरा प्रतापगढला पाठवलं. ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
प्रतापगढ जिल्ह्यातील एका गावातील २१ वर्षीय महिलेला निर्वस्त्र करुन फिरवण्यात आलं. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये महिला रडताना दिसत आहे. महिलेला तिच्या पती आणि त्याच्या कुटुंबियांनी निर्वस्त्र करुन मारहाण केली. प्रतापगढच्या धरियावदमध्ये पहाडा गाव आहे. तिथे ४ दिवसांपूर्वी ही घटना घडली. पीडित महिलेचा विवाह वर्षभरापूर्वी झाला होता. तिचं जवळच्या गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. महिला गर्भवती आहे. चार दिवसांपूर्वी ती प्रियकरासोबत पळून गेली होती. याची माहिती मिळताच कुटुंबियांनी तिला पाठलाग करुन पकडलं आणि तिला निर्वस्त्र करुन गावभर फिरवलं.

0 Comments