-->

Ads

पार्कमध्ये बोलवलं अन् लग्नाला नकार देताच तरुणीसोबत केलं भयंकर कृत्य

दिल्लीच्या मालवीय नगर परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली. मावस बहिणीशी तरुणानं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.


  लग्नाला नकार दिल्याचा राग इतका डोक्यात गेला की त्याने तरुणीसोबत भयंकर कृत्य केलं. तरुणीने लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणाने तिला पार्कमध्ये भेटायला बोलवलं आणि तिच्यासोबत भयानक कृत्य केलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी तरुण हा मावशीचा मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे.

  दिल्लीच्या मालवीय नगर परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली. मावस बहिणीशी तरुणानं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र तिने तिने हे प्रपोजल धुडकावून लावलं. त्याने तरुणीच्या डोक्यात रॉड घालून तिला ठार केलं. त्यानंतर स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली दिली आहे.


  पोलिसांच्या चौकशीमध्ये आरोपीने धक्कादायक खुलासे केले आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा छडा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय इरफान असे आरोपीचे नाव आहे. शिनाख्त नर्गिस असं मृत तरुणीचं नाव आहे. इरफानने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, " नर्गिसला लग्नासाठी प्रपोज केलं होतं, पण तिने नकार दिला. नर्गिसच्या घरचेही तिचं लग्न करुन देण्यासाठी तयार नव्हते. त्यामुळेच नर्गिसने माझ्याशी बोलणेही बंद केले. मी तिला पार्कमध्ये घेऊन गेलो.

  माझा राग अनावर झाला, तिने नकार दिला आणि बोलणंही बंद केलं त्यामुळे त्याच रागातून तिची हत्या केली अशी कबुलीही आरोपीने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं हत्येचे नियोजन तीन दिवस अगोदर केलं होतं. नर्गिस स्टेनो कोर्स करत असल्याचे इरफानला माहीत होतं.


  मालवीय नगरच्या पार्कमधून ती तिच्या केंद्रात जाते. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास तो पार्कमध्ये पोहोचला आणि नर्गिसला बोलण्यासाठी बोलावलं. नर्गिसने बोलण्यास नकार दिल्याने त्याने पिशवीतून लोखंडी रॉड काढून तिच्यावर हल्ला केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर आरोपी स्वत: पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला.

   

  Post a Comment

  0 Comments