-->

Ads

▪️ मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्याच्या पुर्वसंध्येला उमरखेड तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या


▪️ नारळी येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
यवतमाळ प्रतिनिधी :- संजय जाधव

               उमरखेड तालुक्यातील नारळी येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आंब्याच्या झाडाला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक दायक घटना आज सकाळी उघडकीस आली.

            नारळी ता उमरखेड येथील संतोष माधव मखळे ४५ या शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेऊन आपली जिवन यात्रा संपवल्याची हृदय हेलावणारी घटना घडली. त्यांच्यावर ढाणकी  येथील स्टेट बँक चे कर्ज होते तसेच खाजगी कर्ज देखील असल्याचं बोलल्या जात आहे.  सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते त्यामुळे बँक चे व खाजगी असलेले कर्ज कसे फेडावे व कुटुंबाचा गाडा कसा चालवावा याच विवंचनेतुन  या शेतकऱ्यांने आपली जीवन यात्रा संपवली. यांच्या मागे पत्नी,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास बिटरगाव च्या ठाणेदार सुजाता बनसोड यांच्या मार्गदर्शनात  बिट जमादार गजानन खरात, दत्ता कुसराम करीत आहे.

Post a Comment

0 Comments