सर्वोत्तम रस्ते सुविधानच्या माध्यमातून पुणे शहर व जिल्ह्याला वाहतूक कोंडीमुक्त करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत असताना शहरातील राष्ट्रीय महामार्ग 48 वरील एन डी ए चौक अर्थात चांदणी चौक उड्डाणंपुल प्रकल्प व रस्त्याच्या कामाचे तसेच खेड व मंचर बायपासच्या चौपदिकरण कामाचे आज राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार जी, राज्याचे मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील जी, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे जी, खासदार श्री. श्रीरंग बारणे जी, तसेच सर्व आमदार व आमदार व अधिकाऱ्यांच्या उपस्थित लोकार्पण केले.
पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या चांदणी चौक परिसरातील बहुप्रतीक्षित चांदणी चौक उड्डाणंपुल व इंटरचेज प्रकल्पचे आज लोकार्पण करण्यात आले.16.98 कि. मी लांबीच्या व 865कोटी रुपये किमतीच्या या पुलामुळे पुणे शहर व जिल्यातील वाहतूक कोंडीचा मुख्य प्रश्न सुटणार आहे. एकून 16 कि. मी लांबीच्या या प्रकलपांतर्गत 2.2कि. मी लांबीच्या चांदणी चौक एंटरचेंगचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई -बंगलोर महामार्गाच्या दोन्ही बाजून्स 2लेन अतर्गत आणि 2-लेन बाह्य सेवेसाठी आहेत. एकाच एंट्रचेंज मधून वेगवेगळ्या 8 दिशांना जाण्यासाठी एकून 8रॅम्प बनवण्यात आले आहेत, जे विविध भागन्ना मजबूत कनेक्टि्वीटी देतील.या संपूर्ण प्रकल्पत एकूण 4उड्डाणंपुल,1अंदरपासचे रुंदीकरण आणि 2नवीन अंडरपास बांधण्यात आले आहेत. वाहतुकीसाठी संपूर्णपणे तयार असलेल्या या प्रकल्पमुळे चांदणी चौक परिसरात अखंड आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्त्यांचे जाळे विनले जाईल. शहरातील अत्यंत गजबजलेल्या चौकातील रस्त्यांचा एकात्मिक विकास होईल. उड्डाणंपुल आणि सर्व्हिस रस्त्यांमुळे प्रमुख रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होईल.
0 Comments