-->

Ads

मोरवाडी फाटा जवळ कारचा भिषण अपघात १ जागीच ठार २ गंभीर जखमी

पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या कासोळा जवळील मोरवाडी फाटा जवळ चारचाकी कारचा झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवार मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली नरेंद्र अमरसिंग चव्हान (वय ४०) असे मृतकाचे तर लक्षणं चव्हाण (वय ५५) व राजु अमरसिंग चव्हाण (वय ४५) असे गंभीर जखमीचे नाव आहे.सर्वजण हे कोनदरी ता, महागाव येथील रहिवासी आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोणदरी येथील चार ते पाच जण हे आपल्या चारचाकी कार वाहन क्रमांक एम एच ३२ सी ५१६७ ने कोणदरी वरून काळी दौलत मार्गे पुसद येथील रुग्णालयात भरभाव वेगाने जात होते रात्री एक वाजताच्या दरम्यान मोरवाडी फाट्याजवळ भरभाव वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला पलटी खाऊन झाडावर जाऊन आढळली यामध्ये नरेंद्र चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला तर लक्ष्मण चव्हाण व राजू चव्हाण हे दोघे गंभीर जखमी झाले, तर कार मधील इतर जणांना किरकोळ दुखापत झाली यातील गंभीर जखमींना तात्काळ पुसद येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात एका जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नांदेड येथे हलविण्यात आले.सदर घटनेने कोनदरी गावावर शोककळा पसरली आहे



Post a Comment

0 Comments